रेल्वे प्रवाशावर हल्ला करणाऱ्या माथेफिरूस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 11:06 PM2019-05-03T23:06:44+5:302019-05-03T23:06:57+5:30
वसईच्या रेल्वे स्टेशनवरील पादचारी पुलावर एका अनोळखी माथेफिरूने रेल्वे प्रवाशावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी घडली होती
नालासोपारा: वसईच्या रेल्वे स्टेशनवरील पादचारी पुलावर एका अनोळखी माथेफिरूने रेल्वे प्रवाशावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी घडली होती. ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या हल्याने भीतीचे वातावरण पसरले होते. रेल्वे पोलिसांनी फरार अनोळखी माथेफिरूविरु द्ध हत्येचा प्रयत्न हा गुन्हा दाखल करून शोध घेत तपास करताना आरोपी दिनेश ओगानिया (२३) या माथेफिरूला पकडले आहे.
वसईत राहणाऱ्या समीर मर्चट (५२) या प्रवाशावर मंगळवारी संध्याकाळी वसई रोड रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावरून प्लटफॉर्म क्र मांक ३ वर जात असताना अचानक एका अनोळखी माथेफिरूने त्यांना अडवून त्यांच्यावर टोच्याने छातीवर, खांद्याला, हातावर सपासप वार करुन जखमी केले होते. पोलिसांना घटनास्थळाचे सीसीटीव्ही चित्रण मिळाले होते. त्या आधारे पोलिसांनी विविध खबऱ्यांमार्फत तपास सुरू केला होता. हल्लेखोराने अन्य कुणावरही हल्ला करू नये, याची पोलिसांना भीती होती. त्याचा शोध सुरू असताना तो वसई नवघर पुर्वेच्या संत जलाराम बापू नगर मधील वाघरीपाडा येथील रहात असल्याचे समजले. रेल्वे पोलिसांच्या पथकाने घरात झोपलेला असताना दिनेश ओगानिया याला अटक केले आहे.
नेमकी काय होती घटना...
वसईमध्ये राहणारे समीर मर्चट हे मंगळवारी संध्याकाळी चर्चगेटला जाण्यासाठी वसई स्थानकातील पादचारी पुलावरून प्लटफॉर्म क्र मांक ३ वर जात असताना अचानक एका अनोळखी माथेफिरूने त्यांना अडवून त्यांच्यावर टोच्याने छातीवर, खांद्याला, हातावर सपासप वार केले होते. मर्चंट यांना उपचारासाठी वसईच्या खाजगी रु ग्णालयात दाखल करून त्यांच्यावर शस्त्रक्रीया करत त्यांच्या हातात खुपसलेला टोचा काढण्यात आला होता. या हल्ल्याबाबत तेही अनभिज्ञ होत.