सकलजनाची आई वजे्रश्वरीदेवी
By admin | Published: October 16, 2015 01:51 AM2015-10-16T01:51:57+5:302015-10-16T01:51:57+5:30
वसईच्या सीमेवर असलेली वजे्रश्वरीदेवी ही पालघर, ठाणे व मुंबई परिसरातील भक्तांची आराध्य दैवत असून दरवर्षी नवरात्रोत्सवात या मंदिराच्या न्यासातर्फे विविध अध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
वसई : वसईच्या सीमेवर असलेली वजे्रश्वरीदेवी ही पालघर, ठाणे व मुंबई परिसरातील भक्तांची आराध्य दैवत असून दरवर्षी नवरात्रोत्सवात या मंदिराच्या न्यासातर्फे विविध अध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यंदाही विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. वजे्रश्वरीदेवी मंदिराचा परिसर हे पर्यटनक्षेत्र म्हणून ओळखले जाते. दरवर्षी लाखो पर्यटक येथे येत असतात. तसेच वजे्रश्वरीदेवीचे दर्शन घेतल्याशिवाय भाविक माघारी परतत नाहीत.
वजे्रश्वरी देवीच्या पायथ्याशी आल्यावर आपल्याला एखाद्या किल्ल्यावरच जात आहोत असा भास होतो. वजे्रश्वरी मातेचे मंदिर आजुबाजूच्या तटबंदी व बुरूजांमुळे किल्ल्यासारखेच वाटते. या मंदिराची रचना अतिशय सुुुंदर केली आहे. मंदिरात प्रवेश केल्यावर सभामंडप, गाभारा व मुख्य गाभारा असे तीन टप्पे आहेत. मुख्य गाभाऱ्यात देवीच्या सुंदर मुर्ती आहेत. या मंदिरात मध्यभागी वजे्रश्वरी माता उजच्या बाजूला रेणुका माता व डाव्या बाजूला कालिका मातेची भव्य मूर्ती आहे. यामूर्तीवरती चांदीचे छत्र असून नवरात्रीच्या दर दिवशी भरजरी वस्त्रांनी मूर्ती सजविली जातात. या मंदिरात या मूर्तीव्यतीरिक्त महालक्ष्मी, परशुराम, गणपती, मोरबादेवी यांचीही स्थापना करण्यात आली आहे. वजे्रश्वरी मंदिराना पौराणिक, ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे.
या मंदिराचा ऐतिहासिक संदर्भही तेवढाच महत्वाचा आहे. १९६० पर्यंत वसई, तारापूर, माहिम, दमण व इतर किल्ले पोर्तुगिजांच्या ताब्यात होते. पोर्तुगिजांचा अन्याय सहन न झाल्यामुळे येथील नागरीकांनी पेशव्यांना मदत करण्याचे साकडे घातले. यावेळी पेशव्यांनी चिमाजीआप्पांना वसईच्या स्वारीवर पाठविले. चिमाजीआप्पांनी वजे्रश्वरी मातेला असे साकडे घातले की, जर ही लढाई जिंकलो तर मी तुझे मंदिर किल्ल्यासारखे बांधेन. त्यानुसार चिमाजी आप्पांनी वसई किल्ला जिंकल्यानंतर वजे्रश्वरी मातेचे मंदिर बांधून वजे्रश्वरीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. या विजयाची आठवण म्हणून मंदिरासमोर दीपस्तंभ व दीपमाळा उभारण्यात आल्या आहेत. नागरीकांना वजे्रश्वरीच्या मंदिरात येण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या नालासोपारा, वसई-विरार स्थानकावरून एस. टी. बस वाहतूक सेवा दररोज सुरू असते. तर ठाणे व कल्याण येथील नागरीकांना भिवंडी ते गणेशपुरी एस. टी. सेवा आहे.