मोटारसायकल चोरणारी टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 01:58 AM2017-08-02T01:58:32+5:302017-08-02T01:58:32+5:30
पालघर आणि ठाणे जिल्ह्यात मोटार सायकली चोरणाºया टोळीतील तिघांना वालीव पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून चोरलेल्या आठ मोटारसायकली जप्त केल्या आहेत.
वसई : पालघर आणि ठाणे जिल्ह्यात मोटार सायकली चोरणाºया टोळीतील तिघांना वालीव पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून चोरलेल्या आठ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. यामुळे मोटार सायकली चोरणाºया टोळीचा मागोवा घेणे पोलिसांना सोपे जाणार आहे.
वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटारसायकली चोरीचे चार गुन्हे दाखल झाले होते. त्याचा तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी पोलीस उपनिरीक्षक
एस. एस. चव्हाण, व्ही. एस. माने यांच्या नेतृत्वाखाली एक पथक
तयार केले होते. त्याने गवराई पाडा येथे राहणाºया दिपेश वाघ
(२०) याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत दिपेशने
मोटार सायकली चोरल्याची कबुली देऊन आपल्या साथीदारांची नावे सांगितली. त्यानंतर पोलिसांनी दिपक केशव वाघ (२०, रा. वाकड पाडा, ता. मोखाडा) आणि कृष्णा पंढरीनाथ कोले (२२, रा. गवराईपाडा) यांना अटक केली.
या तिघांनी नालासोपारा, वसई, वालीव, वाशिंद खर्डी, मोखाडा आदी परिसरात वेगवेगळ््या साथीदारांसह मोटार सायकली चोरल्याची कबुली
दिली. तपासात वालीव पोलीस ठाण्यातील मोटार सायकलीचे चार गुन्हयांसह तुळींज पोलीस ठाणे, शहापूर पोलीस ठाणे, वाशिंद पोलीस ठाणे आणि मोखाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एक-एक
गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चार लाख किंमतीच्या चोरलेल्या आठ मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी दिली.
या टोळीने अ़नेक गुन्हे केले असून त्यांचे आणखी काही साथिदार आहेत. त्यांचाही तपास सुरु असून
एक मोठी टोळी हाती लागण्याची शक्यता त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.