वसईच्या गिरीकन्या पोहचल्या चंद्रभागा शिखरावर; २० तासांच्या अथक प्रयत्नानंतर मोहीम यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2021 10:41 AM2021-08-06T10:41:55+5:302021-08-06T10:42:11+5:30

भारतातील हिमाचल प्रदेशामधील "चंद्रभागा शिखर" वसईच्या चार गिर्यारोहकांपैकी दोघांकडूनच सर करण्यात आले आहे. दि.15 जुलै रोजी हे सर्व गिर्यारोहक सोलंग अ‍ॅडव्हेंचर व्हॅली येथे पोहोचले होते. बाताल, बेस कॅम्प, कॅम्प -1 असा त्यांनी प्रवास केला.

Mountaineer Girl of Vasai reached Chandrabhaga peak at Himachal, After 20 hours of untiring efforts | वसईच्या गिरीकन्या पोहचल्या चंद्रभागा शिखरावर; २० तासांच्या अथक प्रयत्नानंतर मोहीम यशस्वी

वसईच्या गिरीकन्या पोहचल्या चंद्रभागा शिखरावर; २० तासांच्या अथक प्रयत्नानंतर मोहीम यशस्वी

Next

आशिष राणे

वसई -  वसईतील गिरीकन्या म्हणून सर्वांना सुपरिचित असलेली वसई मांडलई स्थित हर्षांली वर्तक आणि विरार चे  नितीन गांधी यांनी हिमाचल प्रदेशातील स्प्रिती व्हॅलीतील 6 हजार 18 मीटर उंचीवरील सर्वात कठिण असे चंद्रभागा- 14 हे  शिखर नुकतेच सर करण्यात  यश मिळवले आहे. या एकुणच मोहिमेत वसईतील चार जण सहभागी झाले होते मात्र कुलदीप चौधरी व शिवानी वर्तक या दोघांना ही मोहीम अर्धवट सोडून दयावी लागली होती तर देशभरातील विविध भागातून आलेल्या एकूण 12 गिर्यारोहकांचा यात सहभाग होता. तर खास करून कोरोनाच्या संक्रमण काळात तब्बल 20 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर त्यांनी ही अत्यंत कठीण अशी मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण करून दोनच दिवसांपूर्वी आम्ही सर्वं वसईत परतलो असल्याची माहिती वसईतील गिर्यारोहक नितिन गांधी यांनी लोकमत शी बोलताना दिली आहे. 

या मोहिमे विषयी अधिक माहिती देतांना गांधी म्हणाले की,हिमाचल प्रदेशातील स्प्रिती व्हॅलीतील चंद्रभागा- 14 ही खडतर मोहीम फारच अवघड होती,तर मागील तीन वर्षांत चंद्रभागा-14  च्या वाटेला कोणताही गिर्यारोहक त्याची बिकट वाट, अवघड चढण यामुळे फिरकला देखील नव्हता. मात्र इंडियन माऊंटनिंग फाऊंडेशनच्या वतीने तसेच अ‍ॅडव्हेंचर व्हॅलीच्या माध्यमातून ही मोहीम आखण्यात आली होती आणि आम्ही हर्षाली च्या नेतृत्वाखाली वसईतील  चार जणांनी त्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला, त्यात महाराष्ट्रातील 5 गुजरात मधील 5 आणि   इंदोर मधील एक व हरियाणातील 1 अशा एकूण 12 गिर्यारोहकांचा समावेश होता.

प्रवास खडतर तरी पहिला प्रयत्न अयशस्वी !
दि 15 जुलै रोजी हे सर्व गिर्यारोहक सोलंग अ‍ॅडव्हेंचर  व्हॅली येथे पोहोचले होते. बाताल, बेस कॅम्प, कॅम्प -1 असा त्यांनी प्रवास सुरू केला. प्रत्यक्ष मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर  कॅम्प 1 ते समिट पर्यंत 4  हजार फुटावर प्रवास करूनही खराब वातावरणामुळे अवघ्या 300  मीटर अंतरावर पोहोचूनही त्यांना आपली मोहीम अर्धवट सोडावी लागली होती. तब्बल 17 तासांची मेहनत वाया गेली.मात्र  वसईतील कुलदीप चौधरी व शिवानी वर्तक हे हवामानाशी मिळते जुळते होऊ शकले नाही आणि शेवटी दोघाना तंबूतच राहावे लागले.

 पुन्हा नव्याने प्रयत्न जिद्द सोडायची नाही !

पुन्हा नव्या जोमाने गटप्रमुख हर्षांली वर्तक यांच्या गटामधील 4  तर दुसऱ्या गटात 6 जणांनी रात्री 10 वाजताच्या दरम्यान चंद्रभागा-14 ही मोहीम सर करायला सुरुवात केली. अत्यंत बोचरी थंडी, गुडघाभर  बर्फ,  सतत सुरू असलेली बर्फवृष्टी अशा कठिण आव्हानांना सामोरे जात 12 तासांची पायपीट करत अखेरीस दि27 जुलै ला  सकाळी 10  वाजता चंद्रभागाच्या शिखरावर पोहोचले. आणि काय तर तेथे पोहोचताच अभिमानाने भारताचा तिरंगा झेंडा फडकवला. हर्षांली वर्तक हिच्या गटात विरारचे नितीन गांधी,औरंगाबादचा प्रविण शेलके, इंदूरची अ‍ॅनी होते तर वसईच्या कुलदीप चौधरी व शिवानी वर्तक यांना ही मोहीम मात्र अर्धवटच सोडावी लागलीतरी मात्र कोरोना काळात अशा मोहिमेत सहभागी होऊन ती यशस्वी आणि प्रयत्न करत सर केल्याने  या सर्व वसई तील चारही गिर्यारोहकांचे सर्वत्र कौतूक होत आहे.

‘आता स्वप्न कांचनगंगा सर करण्याचे..
हर्षांली वर्तकने देश-विदेशातील अनेक अवघड ट्रेकिंग मोहिमा सर केलेल्या असून यात माऊंट फ्रेंडशिप पिक, हनुमान टिब्बा, माऊंट युनाम, मांऊट मेनथोसा, मांऊट डीकेडी म्हणजे द्रोपदीचा दांडा, माऊंट फ्युजी, माऊंट किल्लीमांजरो, माऊंट इल्बूस या देश-विदेशातील अनेक अवघड मोहिमा तिने आजवर सर केल्या असून आता लक्ष केवळ "कांचनगंगा" ही हिमालयातील अवघड मोहीम तिला सर करायची प्रबळ इच्छा तिने लोकमत शी बोलताना व्यक्त केली असून तिचे ते हे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल यात अजिबात शंका नाही

Web Title: Mountaineer Girl of Vasai reached Chandrabhaga peak at Himachal, After 20 hours of untiring efforts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.