पालघरमध्ये ईव्हीएम विरोधात आंदोलन
By admin | Published: March 31, 2017 05:25 AM2017-03-31T05:25:44+5:302017-03-31T05:25:44+5:30
अनेक राज्यात झालेल्या निवडणुकांमध्ये वापरण्यात आलेल्या ईव्हिएम मशीनमध्ये गोलमाल झाल्याच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर मतपत्रिकेद्वारे
पालघर : अनेक राज्यात झालेल्या निवडणुकांमध्ये वापरण्यात आलेल्या ईव्हिएम मशीनमध्ये गोलमाल झाल्याच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्यात याव्यात या मागणीसाठी आज भारत मुक्ती मोर्चाद्वारे पालघर तहसीलदार कार्यालया समोर ‘राष्ट्रव्यापी लोकतंत्र बचाव’ धरणे धरण्यात आले.
ईव्हीएम मशीनला आंतरराष्ट्रीय मान्यता नसून आताच झालेल्या अनेक राज्यातील निवडणुकांमध्ये वापरण्यात आलेल्या ईव्हीएम मशीनमध्ये गडबड करण्यात आल्याच्या तक्र ारी होत आहेत. त्याबाबत न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आल्या आहेत. ह्या मशिन्समध्ये सेटींग करण्यात आल्याने मतदारांची वास्तव मते नोंदविण्यात आलेली नाहीत. मतदारांनी नोंदवलेली मते पुन्हा तपासण्याची सोय ह्या मशीन मध्ये नसते.मात्र बॅलेट पेपर मध्ये अशी व्यवस्था असल्याने पारदर्शकता राहते. सुप्रीम कोर्टाने ८ आॅक्टोबर २०१३ मध्ये निवडणूक आयोगाला पेपर ट्रेल लावण्याचे आदेश दिले होते. मात्र तीन वर्षांचा कालावधी उलटूनही निवडणूक आयोगाने त्या आदेशाची अमलबजावणी न करता त्या वादग्रस्त ईव्हीएम मशीनचा वापर सुरू ठेवल्यामुळे निवडणूक आयोगा विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. आज अनेक देशात ईव्हीएम मशीनचा वापर केला जात नाही. मात्र आपल्या देशातच ईव्हीएम मशीनचा आग्रह केला जात असल्याने मतदार आपल्या मतदानाने आश्वस्त असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे देशात मुक्त, निष्पक्ष, आणि पारदर्शी निवडणुका करायच्या असल्यास बॅलेट पेपर च्या आधारेच निवडणूक होणे गरजेचे असल्याच्या मागणीसाठी भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने आज पालघर मध्ये आंदोलन करण्यात आले. त्यात ईव्हीएम हटाओ, बॅलेट पेपर लाओ, लोकतंत्र बचाओ आदी घोषणा देण्यात आल्यात. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. (वार्ताहर)