खड्ड्यांना मनपा अधिकाऱ्यांचे नाव देऊन केले आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 12:33 AM2019-07-14T00:33:30+5:302019-07-14T00:33:34+5:30

महानगरपालिकेचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्यामुळे येथील नागरिकांनी शनिवारी चक्क खड्ड्यांना अधिकाऱ्यांचे नाव देऊन आंदोलन केले.

Movement by the name of Municipal officials | खड्ड्यांना मनपा अधिकाऱ्यांचे नाव देऊन केले आंदोलन

खड्ड्यांना मनपा अधिकाऱ्यांचे नाव देऊन केले आंदोलन

Next

विरार : विरार पूर्वेला असलेल्या अनेक भागात रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांबाबत वारंवार तक्रारी करूनही महानगरपालिकेचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्यामुळे येथील नागरिकांनी शनिवारी चक्क खड्ड्यांना अधिकाऱ्यांचे नाव देऊन आंदोलन केले.
विरार पूर्वेतील कातकरीपाडा, गोपचरपाडा, चंदनसार, कुंभारपाडा, भाटपाडा, शिरगांव, कोपरी, घासकोपरी या भागातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक अनेक महिन्यांपासून हैराण आहेत. पावसाळा सुरु होण्याआधीपासून येथे रस्त्यांवर मोठ मोठे खड्डे निर्माण झाले होते. तर याबाबत नागरिकांनी अनेकदा महानगरपालिका अधिकाºयांना पत्र पाठवून तक्रार केली होती. मात्र, महानगरपालिका अधिकाºयांनी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये संताप आहे. परिणामी रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांना महानगरपालिका अधिकाºयांचे नाव देऊन नागरिकांनी आंदोलन केले. महानगरपालिका शहर अभियंता राजेंद्र लाड यांच्या नावाचे फलक देखील येथे लावण्यात आले.
यापूर्वी अनेकदा तक्रार करूनही अधिकाºयांना कोणताही फरक पडला नाही व परिस्थितीत कसलीच सुधारणा न आल्याने नागरिकांनी अशा प्रकारे आंदोलन केले. महानगरपालिका अधिकारी हे सुविधा पुरवण्याच्या नावाखाली केवळ भ्रष्टाचार करत आहेत. तर त्यांच्यामुळे सामान्य माणसाचा जीव धोक्यात येत असल्याचे बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष धर्मशील खरे यांनी सांगितले.
>पावसाळ्यापूर्वीच पडले खड्डे
विरार पूर्वेतील कातकरीपाडा, गोपचरपाडा, चंदनसार, कुंभारपाडा, भाटपाडा, शिरगांव, कोपरी, घासकोपरी या भागातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक अनेक महिन्यांपासून हैराण आहेत.

Web Title: Movement by the name of Municipal officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.