शिक्षकांचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन, ‘पैसे हवे असल्यास सांगा’ संघटनेचे खुले आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 04:10 AM2017-09-17T04:10:26+5:302017-09-17T04:10:29+5:30
जिल्हा परिषदेतील कार्यरत शिक्षकांची आंतरजिल्हा बदली प्रक्रि या होऊन दोन महिन्याचा कालावधी उलटून गेल्यावरही त्यांना कार्यमुक्त करण्यास चालढकल करणा-या शिक्षणविभागाच्या (प्राथमिक) विरोधात शनिवारी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्रा) च्या वतीने जिल्हा परिषदे समोर आंदोलन केले.
पालघर : जिल्हा परिषदेतील कार्यरत शिक्षकांची आंतरजिल्हा बदली प्रक्रि या होऊन दोन महिन्याचा कालावधी उलटून गेल्यावरही त्यांना कार्यमुक्त करण्यास चालढकल करणाºया शिक्षणविभागाच्या (प्राथमिक) विरोधात शनिवारी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्रा) च्या वतीने जिल्हा परिषदे समोर आंदोलन केले.
ग्रामविकास विभागाच्या शिक्षक बदल्यां संदर्भातील परिपत्रकानुसार जिल्हा परिषदेतील कार्यरत २२९ शिक्षकांच्या आॅनलाइन बदल्या करण्यात आल्या होत्या. ह्या शिक्षकांच्या बदल्या करताना त्यांच्या सर्व कागदपत्रांच्या पडताळणी ही करण्यात आली होती. प्राथमिक शिक्षण विभाग व जिल्हा परिषदेतील संबंधित लोकप्रतिनिधी मात्र जिल्ह्यात शिक्षकांची संख्या कमी असल्याचे कारण देत त्यांना कार्यमुक्त करण्यास विरोध दर्शवत आहेत. डहाणूच्या गटविकास अधिकारी व गट शिक्षणाधिकाºयांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केल्याच्या घटनेने शिक्षण विभागातील गैरव्यवहार चव्हाट्यावर आला होता. पालघर पंचायत समितीच्या शिक्षण विभागातही मोठा गोंधळ असल्याचे दिसून आले आहे.
जिल्ह्यातील ४९ शिक्षक जिल्हा बदलीने व ७० शिक्षक समुपदेशाने असे एकूण १२० शिक्षक जिल्ह्यात हजर झाले असताना बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्तीचे आदेश दिले जात नाहीत. आम्हाला कार्यमुक्त करण्यासाठी पैसे हवे असल्यास तसे सांगा असे खुले आव्हानच शिक्षकांनी ही दिले असल्याची माहिती पत्रकारांशी बोलताना काही शिक्षकांनी दिली. आमचे कुटुंब सर्व सामानासह बदलीच्या ठिकाणावर पोचले असताना आम्ही इथेच अडकून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शिक्षकांनी आपल्या संघटनेचे राहुल परदेशी, जिल्हाध्यक्ष दत्ता ढाकणे, मुरली ठेलारी, सोमनाथ कोळी इ.सह शेकडो लोकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर ह्यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. ह्यावेळी अन्य समस्याही त्यांच्या पुढे ठेवण्यात आल्यानंतर ह्याचा सकारात्मक विचार केला जाईल असे त्यांनी सांगितले.