सातपाटी बंदरातील गाळ काढला जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 04:16 AM2017-08-06T04:16:26+5:302017-08-06T04:16:26+5:30

सातपाटी खाडीत साचलेला गाळ काढण्याच्या कामाला लवकरच सुरुवात होईल, तत्पूर्वी बोर्डाच्या अधिकाºयांची आणि संबंधितांची एक बैठकही घेतली जाईल, अशी माहिती महाराष्ट्र मेरिटाईम

The mud of Satpati Bandh will be removed | सातपाटी बंदरातील गाळ काढला जाणार

सातपाटी बंदरातील गाळ काढला जाणार

googlenewsNext

- हितेन नाईक

पालघर : सातपाटी खाडीत साचलेला गाळ काढण्याच्या कामाला लवकरच सुरुवात होईल, तत्पूर्वी बोर्डाच्या अधिकाºयांची आणि संबंधितांची एक बैठकही घेतली जाईल, अशी माहिती महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे सीईओ अतुल पाटणे यांनी दिली. ऐन हंगामात मासेमारीला जाण्यास अडथळे निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर दहिसरच्या आ. मनीषा चौधरी यांनी पाटाणे यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
सातपाटी मच्छिमार बंदरातील नौकायन मार्गात साचलेला गाळ काढण्यासंदर्भातल्या समस्येविषयी मच्छिमार संस्थानी केलेल्या विनंतीनुसार ही बैठक शुक्रवारी महाराष्ट्र मेरी टाईम बोर्डाच्या अधिकाºयांसमवेत मंत्रालयात झाली.
गेल्या ८ ते १० वर्षापासून सातपाटीतील मच्छिमारांना गाळाच्या समस्येने ग्रासले असून मच्छीमार संस्थानी केलेल्या विनंतीनुसार जिल्हा नियोजन समितीने वेळोवेळी निधी उपलब्ध करून देऊनही आजपर्यंत योग्य पद्धतीने काम न झाल्याने गाळाच्या समस्येने उग्ररूप धारण केले आहे. १ आॅगस्टला मासेमारीला सुरुवात झाली तरी नौका खाडीतील गाळा मुळे अडकून पडत असून मासेमारीला जाऊ शकलेल्या नाहीत. ५ दिवसांचा कालावधी या समस्येमुळे फुकट गेल्याने या नुकसानीला जबाबदार कोण? असा प्रश्न मच्छिमार उपस्थित करू लागले आहेत.
गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन मच्छिमार सहकारी संस्था व सर्वोदय सहकारी संस्था या दोन्ही संस्थानी सुचविल्याप्रमाणे जेटी सभोवती चार ठिकाणी नौका येण्याजाण्याच्या मार्गातील गाळ तात्पुरता स्वरूपात युद्ध पातळीवर काढण्याच्या कामाला मंजूरी देण्याची मागणी करण्यात आली होती. त्याप्रमाणे हे काम त्वरीत सुरू करण्याचे आदेश पाटणे यांनी संबंधित अधिकाºयांना आदेश दिले. या बैठकीस कॅ. खत्री मच्छिमार नेते नरेंद्र पाटील, राजेंद्र मेहेर, किशोर मेहेर, विलास मेहेर इ. मान्यवर उपस्थित होते. आता प्रत्यक्षात या कामाला सुरुवात कधी होते? व मच्छीमारी निर्विघ्न कधी सुरू होते. याकडे मच्छीमार समाजाचे लक्ष लागून राहिले आहे.

- उच्चतम भरती शिवाय मासेमारी करून बंदरात परत येताना मच्छिमारांना बोटी रात्रीच्या वेळी जीव धोक्यात घालून ५ ते ७ नॉटीकल मैलावर किंवा जेटीपासून १५० ते २०० मीटर दूर खाडीपात्रात नांगरून ठेवाव्या लागतात. खाडीपात्रात पावसाळ्यात येणाºया पूरजन्य स्थितीचा त्यांना सामना करावा लागतो. तसेच ३ ते ४ दिवस बोटी किनाºयावर लागत नसल्याने मच्छिमारांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते .

Web Title: The mud of Satpati Bandh will be removed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.