पालघरमध्ये बहुरंगी लढती; जि.प.साठी २१९ तर पं.स.साठी ३३० उमेदवार रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 12:06 AM2019-12-31T00:06:37+5:302019-12-31T00:10:34+5:30

जि.प.-पं.स.तून ६३ जणांची माघार

Multicultural fights in Palghar; There are 19 candidates for the ZP and 2 candidates for the RBI | पालघरमध्ये बहुरंगी लढती; जि.प.साठी २१९ तर पं.स.साठी ३३० उमेदवार रिंगणात

पालघरमध्ये बहुरंगी लढती; जि.प.साठी २१९ तर पं.स.साठी ३३० उमेदवार रिंगणात

Next

पालघर : राज्यात महाविकास आघाडीची सत्ता एकत्र नांदत असताना पालघर जिल्ह्यात होत असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत मात्र या महाआघाडीत बिघाडी झाल्याचे पाहावयास मिळाले. निवडणुकीतून माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी जिल्हा परिषद गटातून ३९ उमेदवारांनी, पंचायत समिती गणातून ६३ उमेदवारांनी माघार घेतली. यामुळे जिल्हा परिषदेसाठी आता २१९ तर पंचायत समितीसाठी ३३० उमेदवार रिंगणार राहिले आहेत.

पालघर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १७ गटासाठी ५९ उमेदवार रिंगणात असून पंचायत समितीची सरावली गणाची उमेदवार बिनविरोध झाल्याने उर्वरित ३३ गणांसाठी एकूण १११ उमेदवार रिंगणात आहेत.

पालघर पंचायत समितीच्या ३४ गणांच्या जागेपैकी सरावली गण बिनविरोध झाल्याने ३३ गणाच्या जागेसाठी एकूण १११ उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी सालवड, दांडी पाडा, मान, बºहाणपूर, शिरगाव आणि मायखोप या ठिकाणी दुरंगी लढती होणार आहेत, तर तारापूर, कुरगाव, पास्थळ, काटकर पाडा, बोईसर, बोईसर (वंजारवाडा), सरावली (अवधनगर), उमरोळी, शिगाव (खुताडपाडा), दहिसर तर्फेमनोर, धुकटन, नंडोरे देवखोप, सातपाटी, माहीम, केळवा, एडवन, विराथन-बुद्रुक, सफाळा आणि नवघर घाटीम या ठिकाणी तिरंगी लढती लढल्या जाणार आहेत. चौरंगी लढतीत नवापूर, टेन, मनोर, सावरे एम्बुर व मुरबे येथे रंगला जाणार असून बहुरंगी लढतीमध्ये दांडी,खैरे पाडा आणि कोंढाण या गणांचा समावेश आहे.

पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत सर्वच पक्षाचे उमेदवार रिंगणात असून कुठल्याच पक्षाची युती न झाल्याने सर्वांमध्ये सरळ लढत होणार आहे. विक्रमगड तालुक्यातील पाच जिल्हा परिषद गटांकरिता ३२ तर १० पंचायत समितीसाठी ५४ उमेदवार रिंगणात आहेत. जि.प.च्या तलवाडा- ६, उटावली- ७, दादडे- ८, कुंर्झे- ९, आलोंडा- २ उमेदवार रिंगणात आहेत, तर १० पंचायत समिती गणाकरिता तलवाडा- ५, डोल्हारी खु- ४, करसुड- ३, चिंचघर- ५, वेहेलपाडा- ६, उटावली- ७, कुंर्झे- ४, जांभा- ८, दादडे- ७ आणि आलोंडे- ५ उमेदवार मैदानात आहेत.

जव्हारमध्ये चार जिल्हा परिषद गटात १४ तर पंचायत समिती गणात ३१ उमेदवार रिंगणात आहे. जिल्हा परिषदेच्या गटातून ६ उमेदवारांनी, तर पंचायत समितीत १० उमेदवारांनी माघार घेतली आहे. जव्हार तालुक्यात वावर, कासटवाडी, कौलाळे आणि न्याहाळे बु. असे चार जिल्हा परिषद गट आहेत. जव्हार पंचायत समितीवर गेल्या पंधरा वर्षांपासून भाजपाचा दबदबा आहे. त्यात सेनेचे २ पंचायत समिती सदस्य तर माकपाचे २ सदस्य असे पक्षीय बलाबल आहे.

डहाणू तालुक्यात जिल्हा परिषदेच्या १३ गटातील १० उमेदवारांनी, तर पंचायत समितीच्या २६ गणातील १७ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे भाजप, शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस युती, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, बहुजन विकास आघाडी आणि अपक्ष मिळून जिल्हा परिषदेच्या १३ गटासाठी ६०, तर पंचायत समितीच्या २६ गणासाठी ९६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत.
डहाणू तालुक्यात जिल्हा परिषदेच्या बोर्डी, कासा, सरावली, वणई, मोडगाव, गंजाड, जामशेत, धामणगाव, सायवन, ओसरविरा, कैनाड, धाकटी डहाणू आणि चिंचणी, असे १३ गट असून पंचायत समितीचे सेंनसरी, धामणगाव, गंजाड, कैनाड, आंबेसरी, चळणी, चिखले, सायवन, बोर्डी, धाकटी डहाणू, मोडगाव, हळदपाडा, रणकोळ, विव्हळवेढे, जामशेत, मुरबाड, रायतळी, वाणगाव, चिंचणी, आसनगाव, सरावली, ओसरवीरा, डेहणे, वणई, कासा, अस्वाली असे २६ गण आहेत.

तलासरीत जिल्हा परिषद गटात १९ उमेदवार तर पंचायत समिती गणात ४२ उमेदवार निवडणूक रिगणात आहेत. तलासरी जिल्हा परिषद गटात ३० उमेदवारी अर्ज भरण्यात आले होते. त्यापैकी छाननीत एक अर्ज अवैध ठरविण्यात आल्याने २९ उमेदवारी अर्ज शिल्लक होते. त्यापैकी सोमवारी उमेदवारी माघार घेण्याच्या दिवशी १० जणांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने गटात एकूण १९ उमेदवार निवडणूक रिगणात उभे आहेत. तर पंचायत समिती गणात ५७ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यापैकी ३ उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आल्याने ५४ अर्ज शिल्लक होते. त्यापैकी १२ उमेदवारांनी आपले अर्ज माघार घेतल्याने ४२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. त्यामुळे तलासरी जिल्हा परिषदेच्या पाच गटात १९ उमेदवार तर पंचायत समितीच्या दहा गणात ४२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.

मोखाडा तालुक्यातील ३ जि.प.पैकी २ बिनविरोध झाल्या असून यापैकी आसे गटात राष्ट्रवादीचे हबीब शेख तर पोशेरा गटातून भाजपच्या राखी चोथे यांची बिनविरोध निवड झाली आहे तर खोडाळा गटातून सेनेच्या दमयंती फसाळे आणि भाजप यांच्यात सरळ लढत होणार आहे. तर पंचायत समितीच्या सहा जागांसाठी तब्बल १७ उमेदवार रिंगणात असून आसे गणात ५, मोर्हडा गणात ३, पोशेरा गणात २, सायदे गणात २, खोडाळा गणात ३ आणि सातुर्ली गणात ३ असे उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.

वाडा तालुक्यात जिल्हा परिषद गटातून १३ तर पंचायत समिती गणातून २४ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. यामुळे जिल्हा परिषदेसाठी २३ तर पंचायत समितीच्या १२ जागांसाठी ५९ उमेदवार रिंगणात आहेत. वाडा तालुक्यात जिल्हा परिषदेचे सहा गट असून त्यापैकी कुडूस गटातून तीन, आबिटघर चार, पालसई एक, मांडा दोन, मोज एक तर गारगाव दोन अशा एकूण तेरा उमेदवारांनी तर पंचायत समितीच्या बारा गणापैकी गारगाव दोन, डाहे दोन, मोज पाच, सापने एक, गालतरे एक, मांडा दोन, पालसई एक, केळठण एक, खुपरी तीन, आबिटघर तीन कुडूस दोन व चिंचघर एक अशा एकूण २४ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.
वसई तालुक्यातील जिल्हा परिषद भाताणे गटात ४, चंद्रपाडा गटात ३ तर अर्नाळा गटात ३ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. तर पंचायत समितीमध्ये भाताणे गण, मेढे गण ४, तिल्हेर गण ४, चंद्रपाडा गण २, अर्नाळा गण ३, अर्नाळा किल्ल्या गण ४, वासलई गणात ३ असे उमेदवार लढत देणार आहेत.

७ जानेवारीकडे साऱ्यांचे लागले लक्ष
पालघर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या बोईसर (वंजारवाडा), सरावली, सावरे-एम्बुर आणि शिरगाव येथे दुरंगी लढत रंगणार असून दांडी, पास्थळ, खैरे पाडा, नंडोरे देवखोप, सातपाटी, केळवा, एडवन, सफाळा येथे तिरंगी लढती रंगणार आहेत. तर चौरंगी लढतीत तारापूर, शिगाव- खुताडपाडा आणि मनोर भागात रंगणार असून बोईसर (काटकर पाडा) आणि बºहाणपूर येथे बहुरंगी लढती होणार आहेत. त्यामुळे निवडून कोण येते याकडे साºयांचे लक्ष लागले आहे.

वसई तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीचे अंतिम उमेदवार जाहीर झाले असून तालुक्यात बहुजन विकास आघाडी, शिवसेना, भाजप यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. तर कळंब जिल्हा परिषदेत बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बिनविरोध आले असून कळंब पंचायत समिती गणात भाजपच्या उमेदवारांनी बिनविरोध बाजी मारली आहे. कळंब गटातून निलिमा भोवर या बविआकडून तर याच गणातून भाजपच्या अनिता जाधव बिनविरोध निवडून आल्या.

Web Title: Multicultural fights in Palghar; There are 19 candidates for the ZP and 2 candidates for the RBI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.