शहापूरमध्ये मुंबई-नाशिक महामार्ग रोखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 12:59 AM2020-01-09T00:59:40+5:302020-01-09T00:59:44+5:30

देशपातळीवरील विविध संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला पाठिंबा देत शहापूर तालुका सिटू व अन्य संघटनेचे हजारो कामगार रस्त्यावर उतरले.

Mumbai-Nashik highway blocked in Shahpur | शहापूरमध्ये मुंबई-नाशिक महामार्ग रोखला

शहापूरमध्ये मुंबई-नाशिक महामार्ग रोखला

googlenewsNext

कसारा/किन्हवली : केंद्र सरकारच्या सामान्य कामगार आणि शेतकऱ्यांविरोधात असणा-या धोरणाविरोधात केंद्रीय कामगार संघटना आणि देशपातळीवरील विविध संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला पाठिंबा देत शहापूर तालुका सिटू व अन्य संघटनेचे हजारो कामगार रस्त्यावर उतरले. आंदोलनात उतरलेल्या शेतकरी-कामगारांनी चेरपोली घाटाच्या अलीकडे मुंबई-नाशिक महामार्ग क्र मांक-३ शेकडो कार्यकर्त्यांनी एक तास रोखून धरला होता. त्यामुळे दोन्ही दिशांकडील मार्गांवर एक-दीड तास वाहतूककोंडी झाली होती. तालुक्यात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला असला तरी बहुतांश शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता. सहा तासांनंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
स्थानिक बेरोजगार युवकयुवती, शेतकरी कष्टकरी, जनसामान्यांच्या मागण्या घेऊन सिटू, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जनसंघटना किसान सभा, जनवादी महिला संघटना, डेमोक्रेटिक युथ फेडरेशन, स्टुडंट्स फेडरेशन या संघटनांनी सरकारच्या ध्येयधोरणांचा निषेध करत बुधवारी सकाळी ११.३० वाजता शहापूर बसस्थानकातून मोर्चाला सुरुवात केली. सिटू शहापूर तालुका कमिटीचे अध्यक्ष कॉ. विजय विशे यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चात काँग्रेसचे शहापुर तालुका अध्यक्ष महेश धानके, शिवसेनेच्या महिला आघाडी ग्रा. जिल्हा प्रमूख रश्मी निमसे, किसन सभेचे व इतर सर्व संघटनांचे पदाधिकारी, महिला वर्ग हया मोर्चात मोठया संख्येने सहभागी झाले होते. हा मोर्चा पोलिसांनी महामार्गाकडे जाणाºया रस्त्यावर अडवला. त्या वेळी मोर्चेकऱ्यांच्या मागण्यांबाबत तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी, गटविकास अधिकारी अशोक भवारी, उपविभागीय पोलीस अधिकारी सावंत, पोलीस निरीक्षक आढाव, वनविभागाचे अधिकारी देशमुख आदी विविध विभागाच्या अधिकाºयांशी चर्चा केली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित नसल्याने मोर्चेकºयांनी नाराजी व्यक्त केली. या चर्चेत मोर्चेकºयांच्या मागण्या सोडवण्याबाबत संबंधित अधिकाºयांनी आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्ग क्र मांक ३ वर हजारो कामगार, महिला आणि युवकांनी तब्बल एक तास ठिय्या धरून संपूर्ण महामार्ग रोखून धरला.
आंदोलनात देशव्यापी संपाच्या १२ मागण्या आणि स्थानिक मागण्यांमध्ये वर्षानुवर्षे प्रलंबित वनदाव्यांचे प्रस्ताव तत्काळ मंजूर करा. तालुक्यातील ३-२ चे प्रस्ताव निकाली काढा. तालुक्यातील बेरोजगार आयटीआय, डिग्री, डिप्लोमा, सुशिक्षित युवक-युवतींचे सर्वेक्षण करून तालुक्यातील कारखान्यांत त्यांना योग्यतेप्रमाणे कायमस्वरूपी तत्त्वावर सामावून घ्या. बेरोजगार युवक-युवती आणि शेतकºयांच्या मुलांनी शिक्षणासाठी घेतलेली कर्जे माफ करा. तालुक्यात ईएसआयसी रुग्णालय उभारा. इस्पी ग्लासच्या कामगारांवर हल्ला करणाºया ठेकेदारांवर गुन्हा दाखल करा. कंत्राटी पद्धत बंद करा व किमान वेतन कायद्या राबवा. विद्या प्रशासनाची चौकशी करा. या मागण्या घेऊन सिटू, किसान सभा, मार्क्सवादी कम्युनिस्ट रस्त्यावर उतरले होते.
>मुरबाडमध्ये महसूल कर्मचाºयांचे ‘कामबंद’
मुरबाड : देशभरात सरकारी धोरणांविरोधात भारत बंद आंदोलन करण्यात आले. त्याला मुरबाडमध्ये अत्यल्प प्रतिसाद मिळाला. औद्योगिक क्षेत्रातील सिटू कामगार संघटना आणि मुरबाड तहसील महसुली कर्मचारी वगळता सर्वत्र कामकाज सुरळीत सुरू होते. मुरबाड तालुकाध्यक्ष
दिलीप कराळे, जनरल सेक्रे टरी सागर भावार्थे यांच्यासह जगन भालेराव, सुनील लाटे, समीर भालेराव, चंद्रकांत गायकर आदींनी आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी सिटू संघटनेतर्फे अनेक मागण्या करण्यात आल्या होत्या.
तहसीलदार कार्यालयातील महसुली कर्मचाºयांनी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देत कामबंद करून देशव्यापी संपात आपला सहभाग नोंदवला.
>अंबरनाथमध्ये बंदला मिळाला संमिश्र प्रतिसाद
अंबरनाथ : केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या देशव्यापी बंदला अंबरनाथमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. आयुधनिर्मिती कारखान्यातील इंटक, लालबावटा या कामगार संघटना संपात सहभागी झाल्या होत्या. ७० टक्के कामगार संपात सहभागी झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करा, देशाच्या संरक्षणासाठी कार्यरत असणाºया कर्मचाºयांना सैन्य दलातील कर्मचाºयांप्रमाणे पेन्शन योजना लागू करा. आॅर्डनन्सचे खाजगीकरण रद्द करा, सर्व खात्यांतील रिक्त पदे त्वरित भरा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.राजेश बैद, राजू खराडे, हबीब अहमद, महेश गायकवाड, विनोद रसाने आदी विविध कामगार संघटनांच्या पदाधिकाºयांनी केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करून कर्मचाºयांनी निषेध व्यक्त केला. त्याचप्रमाणे अंबरनाथ शिधावाटप कार्यालयातही शुकशुकाट दिसत होता. शिधावाटप कार्यालयाचे कुलूपही काढले नव्हते. तसेच तहसीलदार कार्यालयातही अधिकारी, कर्मचाºयांची रोजप्रमाणे वर्दळ नसल्याने शांतता पसरली होती. बंदच्या काळात अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
>बॅरिकेड्स फेकण्याचा प्रयत्न
पोलिसांनी मोर्चेकºयांना ‘रास्ता रोको’ करण्यापासून रोखले असता त्यांनी आक्र मक पवित्रा घेत पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्सही फेकण्याचा प्रयत्न केला. विभागीय पोलीस अधिकारी दिलीप सावंत आणि शहापूर पोलीस निरीक्षक घनश्याम आढाव यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार झाला नाही.
माणुसकीचे दर्शन
रस्ता रोकोवेळी कसाराकडून भरधाव वेगात येणाºया रु ग्णवाहिकेला रस्ता करून वाट मोकळी करून आंदोलकांनी माणूसकीचे दर्शन घडवले.

Web Title: Mumbai-Nashik highway blocked in Shahpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.