मुंबई-नाशिकच्या पर्यटकांचा मोर्चा पालघरकडे, सलग तीन दिवसांची सुट्टी अन् ख्रिसमस साजरा करण्याचा उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 12:23 AM2020-12-26T00:23:53+5:302020-12-26T00:24:15+5:30

Palghar : कोरोनाचा उद्रेक आता हळूहळू बऱ्यापैकी ओसरत असल्याने सरकारने पर्यटनावर लादलेली अनेक बंधने हटवली आहेत, तसेच करमणुकीच्या साधनांना परवानगी दिली आहे.

Mumbai-Nashik tourists march towards Palghar, excitement to celebrate Christmas for three days in a row | मुंबई-नाशिकच्या पर्यटकांचा मोर्चा पालघरकडे, सलग तीन दिवसांची सुट्टी अन् ख्रिसमस साजरा करण्याचा उत्साह

मुंबई-नाशिकच्या पर्यटकांचा मोर्चा पालघरकडे, सलग तीन दिवसांची सुट्टी अन् ख्रिसमस साजरा करण्याचा उत्साह

Next

पालघर : मुंबईमध्ये रात्री ११ ते सकाळी ६ दरम्यान असलेल्या संचारबंदीमुळे मजा करण्यास मुकणार असल्याने ख्रिसमसमुळे सलग तीन दिवस आलेल्या सुट्ट्यांची मजा लुटण्यासाठी मुंबई, नाशिक आदी भागांतून शेकडो पर्यटक जिल्ह्यात दाखल झाले आहेत. जिल्ह्यातील  केळवे, बोर्डी, दातीवरे 
आदी भागांत पर्यटकांची मोठी संख्या दिसून येत आहे. 
कोरोनाचा उद्रेक आता हळूहळू बऱ्यापैकी ओसरत असल्याने सरकारने पर्यटनावर लादलेली अनेक बंधने हटवली आहेत, तसेच करमणुकीच्या साधनांना परवानगी दिली आहे. त्याचप्रमाणे वॉटर स्पोर्ट, नौकानयन आणि मनोरंजन पार्क उघडले गेले आहेत. २५ डिसेंबर ख्रिसमस आणि सलग आलेल्या शनिवार, रविवार अशा तीन दिवसांच्या सुट्ट्यांमुळे कोरोनाकाळात घरात अडकून पडलेली अनेक कुटुंबे जिल्ह्यातील ११० किमीच्या किनाऱ्यावर उभारलेल्या पर्यंटनस्थळांवरील रिसॉर्ट, हॉटेल्समध्ये दाखल झाली आहेत. त्यामुळे पालघरच्या केळवे, डहाणू, नरपड, बोर्डी, उसरणी, कोरेसर, वसई तालुक्यातील कळंब, राजोडी, अर्नाळा आदी भागांत पर्यटकांनी किनारे फुलून गेले आहेत.
हॉटेल रेस्टॉरंट, लॉजिंग पर्यटकांनी व्यापले आहेत. दरम्यान, गर्दी होऊ नये यासाठी मुंबई महानगरपालिकेने नाताळ सण आणि थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर रात्री ११ ते सकाळी ६ या कालावधीत पाचपेक्षा अधिक नागरिकांना फिरण्यास मनाई केली आहे, मात्र पालघर जिल्ह्यामध्ये असा कुठलाही मनाई आदेश जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी जारी केला नाही. त्यामुळे हॉटेल मालक, रिसॉर्ट मालक यांनी समाधान व्यक्त केले असून  मागील १० महिन्यांपासून मरगळ आलेल्या या व्यवसायाला पुनरुज्जीवित करण्यासाठी ख्रिसमससह आलेल्या सलग तीन दिवस सुट्ट्यांची संधी साधण्यासाठी हॉटेल मालक सज्ज झाले आहेत.

कडक पोलीस बंदोबस्त
केळवे सागरी पोलिसांनी पर्यटकांच्या वाढत्या गर्दीला रोखण्यासाठी बीचवर पोलीस बंदोबस्त वाढविला असून सर्व हॉटेल्स, रिसॉर्ट मालकांना डीजेबंदी, मद्यपानासह वेळेचे बंधन पाळण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती सागरी पोलीस ठाण्याचे सपोनि बी.जी. गायकवाड यांनी ‘लोकमत’ला दिली. मुंबई, नाशिक आदी भागांतून येणारी गर्दी, केळवे पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या हॉटेल्समध्ये रेव्ह पार्टी, मादक द्रव्यांचा वापर होऊ नये यासाठी पोलीस सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Mumbai-Nashik tourists march towards Palghar, excitement to celebrate Christmas for three days in a row

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :palgharपालघर