सानुग्रह अनुदानासाठी पालिका कर्मचाऱ्यांचे आयुक्त व आमदारांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2020 06:12 PM2020-10-30T18:12:36+5:302020-10-30T18:12:45+5:30
वसई विरार महापालिकेवर सद्या दि.28 जून 2020 रोजी मुदत संपल्याने प्रशासक नियुक्त करण्यात आला असल्याने यावेळी सानुग्रह अनुदान मिळणार कि नाही असा गंभीर प्रश्न कर्मचारी वर्गांला पडला आहे.
वसई विरार शहर महापालिकेतील कर्मचारी वर्गाला यावर्षी सानुग्रह अनुदान मिळणार कि नाही अशा द्विधा मनस्थितीत असलेल्या वसई विरार महानगरपालिका अधिकारी - कर्मचारी संघटनेने दिवाळी पूर्वी कर्मचार्यांना सानुग्रह अनुदान मिळावे याकरिता बविआ अध्यक्ष तथा वसईचे आम.हितेंद्र ठाकूर आणि महापालिका आयुक्त तथा प्रशासक गंगाथरन डी याना साकडे घातले आहे.
वसई विरार महापालिकेवर सद्या दि.28 जून 2020 रोजी मुदत संपल्याने प्रशासक नियुक्त करण्यात आला असल्याने यावेळी सानुग्रह अनुदान मिळणार कि नाही असा गंभीर प्रश्न कर्मचारी वर्गांला पडला आहे.
त्यातच कोरोनाचे संक्रमण किंबहुना ते कमीही होत आहे व दिवाळी सण ही तोंडावर आला असताना कोरोनाच्या काळात पालिका कर्मचारी वर्गानी दिवस रात्र काम केले असून त्याची दखल महापालिका प्रशासनाने घ्यावी आणि कर्मचार्यांना तातडीने सानुग्रह अनुदान मंजूर करावे या मागणी साठी गुरुवारी वसई विरार महानगरपालिका अधिकारी- कर्मचारी संघटनेने महापालिका आयुक्त तथा प्रशासक गंगाथरन डी . व वसई चे आमदार हितेंद्र ठाकूर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या दोघांनाही या मागणी बाबतचे निवेदन सादर केलेयाप्रसंगी सानुग्रह अनुदान बाबतीत ला हा प्रश्न सोडविण्यासाठी साकडे घातले आहे. लोकप्रतिनिधींच्या काळात कर्मचार्यांना अनुदान व्यवस्थित पणे मिळत होते. त्यामुळे यावेळीही हे अनुदान मिळावे अशी मागणी संघटनेच्या शिष्टमंडळाने केली आहे.
दरम्यान या कर्मचारी वर्गातील शिष्टमंडळात अध्यक्ष सुधाकर संखे ,संजू पाटील खजिनदार स्मिता भोईर ,मेरी डाबरे, कल्पेश पाटील, उमेश म्हसणेकर होता.
यावेळी आम. हितेंद्र ठाकूर यांनी कोरोनाच्या काळात कर्मचार्यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले आणि आपण या प्रश्नात नक्कीच लक्ष घालू असे ही सांगितले तर माजी महापौर प्रवीण शेट्टी यांनी हि कर्मचार्यांनी कोरोनासारख्या महामारीच्या काळात चांगले व उत्तम काम केले असून त्यांना इतर महापालिका प्रमाणेच अनुदान देण्याची मागणी देखील आयुक्तांकडे केली असल्याचे स्पष्ट केलं.
त्यामुळे आता आयुक्त तथा प्रशासक गंगाथरन डी
कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदान बाबतीत कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.