माजी सैनिकांना महापालिकेने केली मालमत्ताकरमाफी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 05:33 AM2018-08-31T05:33:53+5:302018-08-31T05:34:24+5:30
देशासाठी लढणाऱ्या सैनिकांना आता १०० टक्के मालमत्ता कर माफी करणारा ठराव वसई विरार महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या महासभेत एकमताने मंजूर केला.
विरार : देशासाठी लढणाऱ्या सैनिकांना आता १०० टक्के मालमत्ता कर माफी करणारा ठराव वसई विरार महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या महासभेत एकमताने मंजूर केला. सैनिकांना आधी मालमत्ता करात ५० टक्के सूट दिली गेली होती. मात्र आता पूर्ण १०० टक्के सूट सैनिकांना मालमत्ता करात मिळणार आहे.
संरक्षण दलातील शौर्य पदक किंवा सेवा पदक विजेते आणि माजी सैनिक अथवा त्यांच्या पत्नी यांच्या नावावरील एका मालमत्तेच्या करात सूट द्यावी असा निर्णय या सभेत झाला तर नगरसेवक पंकज ठाकूर यांनी या निर्णयाचे समर्थन केले. हा प्रस्ताव व्यवस्थित अमलात यावा. सैनिकांच्या विकल्या गेलेल्या मालमत्तांना कर माफी दिली जाऊ नये.अशी भूमिका शिवसेनेच्या गटनेत्या किरण चेंदवणकर यांनी मांडली. हा प्रस्तावाला एकमताने संमंत झाला. या निर्णयाने एक आदर्श निर्माण झाल्याचे नगरसेवक आजीव पाटील, उमेश नाईक व सुदेश चौधरी यांनी म्हटले आहे. तसेच या निर्णयाने सैनिकांच्या कुटुंबियांना देखील आनंद होईल अशी आशा महापालिकेने व्यक्त केली आहे.