रेल्वेच्या मदतीला पालिका धावली
By admin | Published: March 10, 2017 02:44 AM2017-03-10T02:44:04+5:302017-03-10T02:44:04+5:30
मंगळवारी दुपारी विरार रेल्वे स्टेशनमध्ये जयपूर एक्सप्रेसखाली चिरडून सात म्हशी ठार झाल्या होत्या. यावेळी वसई विरार महापालिकेच्या अग्नीशमन दलाचे जवान आणि सफाई
वसई : मंगळवारी दुपारी विरार रेल्वे स्टेशनमध्ये जयपूर एक्सप्रेसखाली चिरडून सात म्हशी ठार झाल्या होत्या. यावेळी वसई विरार महापालिकेच्या अग्नीशमन दलाचे जवान आणि सफाई कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यात भाग घेतला.
बुधवारी दुपारी काही म्हशी रेल्वे ट्रकमधून विरार रेल्वे स्टेशनच्या दिशेने निघाल्या होत्या. त्याचवेळी मुंबईकडे जाणारी जयपूर-बांद्रा एक्सप्रेस १ वाजून १५ मिनिटांनी वेगाने आली. दुर्दैवाने या म्हशी नेमक्या त्याच ट्रकवरून एकापाठोपाठ एक निघाल्या होत्या. गाडी अतिशय वेगाने असल्याने खाली चिरडून सातही म्हशींच्या अक्षरश: ंिचंधड्या उडाल्या.
गाडीखाली अडकलेल्या म्हशी काढण्यासाठी रेल्वेकडे तितके मनुष्यबळ नव्हते. त्यामुळे रेल्वेने वसई विरार महापालिकेची मदत मागितली. महापालिकेने अग्नीशमन दलाचे जवान आणि सफाई कर्मचाऱ्यांना त्याठिकाणी पाठवले. रेल्वे कर्मचारी आणि महापालिका कर्मचाऱ्यांनी मेहनत करून म्हशींचे मृतदेह आणि अडकलेले अवयव बाहेर काढले. त्यानंतर गाडी मुंबईकडे रवाना झाली. हा सर्व सोपस्कार पार पाडण्यासाठी तब्बल चार तासांचा अवधी लागला. (वार्ताहर)