अदिवासी महिलेच्या जमीनीवरील अतिक्रमणावर पालिकेची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2018 01:29 PM2018-02-09T13:29:06+5:302018-02-09T13:29:23+5:30
काशिमीरयाच्या मांडवी पाडा येथील आदिवासी जमीनीवर बळजबरी बांधलेल्या बेकायदा बांधकामां बाबत लोकमत हॅलो ठाणे मध्ये वृत्त आल्या नंतर पालिकेने तोेडक कारवाई केली.
मीरारोड - काशिमीरयाच्या मांडवी पाडा येथील आदिवासी जमीनीवर बळजबरी बांधलेल्या बेकायदा बांधकामां बाबत लोकमत हॅलो ठाणे मध्ये वृत्त आल्या नंतर पालिकेने तोेडक कारवाई केली. पण येथील शिवशक्ती महिला मंडळा सह अन्यकाही बेकायदा बांधकामे कायम आहेत. तर गुंडगीरी करणारया झोपडीदादां विरुध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी करुन देखील पोलीस कारवाई करत नसल्याची तक्रार आदिवासी महिलेने पोलीस अधिक्षक डॉ. महेश पाटील यांच्या कडे केली आहे.
मांडवी पाडा, संत झेवीयर्स शाळे मागे चांगुणा बाबर व कुटुंबियांची जमीन असुन आहे. भुमाफियांनी गुंडगीरी करुन बेकायदा झोपड्या व पक्की बांधकामे केल्याच्या तक्रारी सातत्याने चांगुणा यांनी पालिके कडे केल्या होत्या. मनसेचे प्रमोद देठे यांनी देखील कारवाईची मागणी केली होती.
पण कारवाई होत नसल्याची बाब लोकमत मध्ये प्रसिध्द झाल्या वर पालिकेचे प्रभाग अधिकारी चंद्रकांत बोरसे यांनी तातडीने तोडक कारवाई केली. येथील झोपड्या व बांधकामे पाडुन टाकली. पण शिवशक्ती महिला मंडळाचे तसेच काही अन्य बेकायदा बांधकामे मात्र पोलीस बंदोबस्ता अभावी राहिल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.
दरम्यान झोपडीदादांच्या गुंडगीरी विरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात सातत्याने तक्रारी करुन सुध्दा पोलीस गुन्हे दाखल करत नसल्याने चांगुणा यांनी पोलीस अधिक्षक डॉ. महेश पाटील यांच्या कडे तक्रार केली आहे.