वसई विरार महापालिका हद्दीतील पालिकेची रुग्णालये अग्निशमन रोधक यंत्रणेने सुस्थितीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 09:51 PM2021-01-09T21:51:13+5:302021-01-09T21:52:35+5:30
Vasai Virar Municipal Corporation : वसई विरार महापालिकेच्या वैद्यकीय व अग्निशमन विभाग प्रशासनाने उत्तम पावले उचलली असून सर्व रुग्णालयात दक्षता म्हणून सूचना ही देण्यात आल्या आहेत.
आशिष राणे
वसई- वसई विरार शहर महापालिका हद्दीतील महापालिकेची मुख्य रुग्णालये व प्रसूती माता भगिनी नवजात शिशु सहीत रुग्णालये केंद्र ही वैद्यकीय दक्षता आणि सुरक्षेच्या दृष्टीने पाहता याठिकाणी अग्निशमन रोधक यंत्रणेने सुस्थितीत असून आम्ही वेळोवेळी योग्य ती काळजी घेत असल्याची माहिती पालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ सुरेखा वाळके यांनी लोकमतला दिली.
भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या अतिदक्षता विभागातील नवजात शिशु केअर युनीटमध्ये शाॅर्ट सर्किटने आग लागण्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर वसई विरार महापालिका प्रशासनाने उभारलेली रुग्णालये, माता प्रसुती केंद्र ही वसई, सातीवली, जुचंद्र आदी ठिकाणी कार्यरत असून त्यांच्या रुग्णालयाच्या अवस्थेबाबत अग्निशमन विभागाला विचारले असता त्यात उपलब्ध अतिदक्षता, प्रसूती विभाग, नवजात शिशR विभागाची सध्याची अवस्था उत्तम आहेच. सोबतच येथील अग्निरोधक व्यवस्था, व त्याचे नियमित फायर ऑडीट होत असल्याची माहिती महापालिका अग्निशमन दल प्रमुख दिलीप पालव यांनी लोकमत ला दिली. एकूणच भंडारा जिल्ह्यातील जळीत घटनेनंतर वसई विरार महापालिकेच्या वैद्यकीय व अग्निशमन विभाग प्रशासनाने उत्तम पावले उचलली असून सर्व रुग्णालयात दक्षता म्हणून सूचना ही देण्यात आल्या आहेत.