मीरा-भाईंदर महापालिकेने मालकीचे भूखंड विकायला काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 12:39 AM2019-08-09T00:39:24+5:302019-08-09T00:39:35+5:30

आजच्या महासभेत प्रस्ताव, सर्वांचे लागले लक्ष

The municipality started to develop the ownership of the plot | मीरा-भाईंदर महापालिकेने मालकीचे भूखंड विकायला काढले

मीरा-भाईंदर महापालिकेने मालकीचे भूखंड विकायला काढले

googlenewsNext

मीरा रोड : मीरा-भाईंदरमधील ३३४ पैकी अवघी १०६ आरक्षणेच विकसित केलेली असताना उर्वरित २२८ आरक्षणे नागरिक तसेच शहराच्या हितासाठी विकसित करण्याऐवजी सत्ताधारी भाजप आणि महापालिका आयुक्तांनी पालिकेच्या मालकीच्या आरक्षणाच्या जागाच विकायला काढल्या आहेत. दोन आरक्षणांच्या जागाविक्रीचे, तर उद्यानाच्या आरक्षणातून हॉटेलसाठी जागा कमी करण्याचा तर एका लॉजसाठी हरितपट्टा रद्द करण्याचे प्रस्तावच महापौरांनी उद्याच्या महासभेत आणले आहेत.

मीरा रोडच्या कनकिया येथील प्राथमिक शाळा व खेळाचे मैदान हे पाच हजार चौ.मी.चे आरक्षण क्र. २५२ आहे. या आरक्षणापैकी निम्मे म्हणजेच दोन हजार १५० चौ.मी. इतके क्षेत्र पालिकेच्या मालकीचे आहे. पालिकेच्या मालकीची जागा लल्लन तिवारी यांच्या राहुल एज्युकेशन सोसायटीला विकण्याचा प्रस्ताव आहे. 

दुसरा प्रस्ताव आरक्षण क्र. ३२८ खेळाचे मैदान व प्राथमिक शाळेचा आहे. नऊ हजार ७६७ चौ.मी. क्षेत्र असून त्यातील महापालिकेच्या मालकीची एक हजार ३६१ चौ.मी. इतकी जागा आहे. तर सेंट विल्फ्रेड एज्युकेशन सोसायटीकडे आरक्षणातील सात हजार ५२६ चौ.मी. इतकी जागा आहे. त्यामुळे पालिकेच्या मालकीची जागा या संस्थेला विकण्याचा प्रस्ताव आहे. तिसरा प्रस्ताव हा मीरा रोडच्या बेव्हर्ली पार्कजवळील उद्यानाच्या आरक्षण क्र. ३०५ मधून एका हॉटेलसाठी मोक्याची दर्शनी जागा कमी करण्याचा आहे.

हरितपट्टा रद्द करण्याचा प्रस्ताव : उत्तनच्या धावगी मार्गावर मौजे डोंगरी येथील या जागा हरितपट्टयात आहेत. या जागा डी-१ झोनमध्ये असल्याने ०.३ चटईक्षेत्र अधिक प्रीमियम ०.२ असे ०.५ चटईक्षेत्र वापरता येते. परंतु, जागामालक शुभारंभ रिसॉर्ट यांनी सर्व जमीन डी-२ या झोनमध्ये बदलण्याची मागणी सरकारकडे केली होती. झोन बदलासाठी महापालिकेने सर्व प्रक्रिया पार पाडून सादर केल्यास गुणवत्तेवर निर्णय घेईल, असे नगरविकास विभागाने कळवले होते. वाढीव चटई क्षेत्र मिळवण्यासाठी हरितपट्टा रद्द करण्याचा घाट घातला आहे.

Web Title: The municipality started to develop the ownership of the plot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.