मुरबाडला शेतक-याचा स्वाइनने बळी , भयभीत वातावरणात अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 01:45 AM2017-09-02T01:45:53+5:302017-09-02T01:46:08+5:30
तालुक्यातील सासणे येथील सुभाष विठ्ठल देशमुख (५५) या शेतकºयाचा गुरुवारी स्वाइनने मृत्यू झाला. संसर्गाच्या भीतीमुळे अंत्यसंस्काराच्या वेळेस नागरिकांनी तोंडाला मास्क लावला होता.
मुरबाड : तालुक्यातील सासणे येथील सुभाष विठ्ठल देशमुख (५५) या शेतकºयाचा गुरुवारी स्वाइनने मृत्यू झाला. संसर्गाच्या भीतीमुळे अंत्यसंस्काराच्या वेळेस नागरिकांनी तोंडाला मास्क लावला होता.
मुरबाड - कर्जत - पुणे या राष्ट्रीय महामार्गावरील सासणे येथील आरोग्य केंद्र हे सुमारे दहा वर्षापासून बंद आहे. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात नागरिकांना अत्यंत बिकट परिस्थितीला तोंड द्यावे लागते. आरोग्य केंद्र बंद असल्याचा फटका देशमुख यांनाही बसला.
न्हावे येथील सुभाष देशमुख यांना स्वाइनची लागण झाली. मात्र, आरोग्य केंद्र बंद असल्याने त्यांनी थेट मुंबई गाठत के.ई.एम. रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार घेतले. त्याचा काहीही फायदा न होऊन उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
ठाणे जिल्हा परिषद एकीकडे नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी दर वर्षी नव्याने आरोग्य केंद्राना मंजुरी देते. मात्र, मुरबाड तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या म्हसा आरोग्य केद्रांत औषधांचा तसेच कर्मचाºयांचा देखील तुटवडा आहे. त्यातच सासणे येथील आरोग्य केंद्र देखील बंद आहे. त्यामुळे परिसरातील न्हावे, केदुर्ली, रावगाव, तोंडली, काकडपाडा, शिरवली, टेपाचीवाडी वाडी, खोकाटे वाडी येथे संतधार पावसामुळे विविध आजारांनी डोके वर काढले आहे.
आरोग्य विभाग मात्र, निद्रावस्थेत असल्याने त्यांच्या कारभाराबाबत सर्वत्र संताप आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. येथील आरोग्य व्यवस्थाही सुधारण्याची मागणी या नागरिकांनी केली आहे.