दहा वर्षांच्या मुलाकडून मेहुण्याची हत्या

By Admin | Published: May 24, 2016 02:47 AM2016-05-24T02:47:51+5:302016-05-24T02:47:51+5:30

अवघ्या दहा वर्षाच्या लहानग्यानें आपल्या सख्ख्या मेहुण्याला ठार मारल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी घडली. आपल्या बहिणीला मारहाण करीत असलेल्या मेव्हण्यावर दहा वर्षाच्या

The murder of a 10-year-old boy | दहा वर्षांच्या मुलाकडून मेहुण्याची हत्या

दहा वर्षांच्या मुलाकडून मेहुण्याची हत्या

googlenewsNext

वसई : अवघ्या दहा वर्षाच्या लहानग्यानें आपल्या सख्ख्या मेहुण्याला ठार मारल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी घडली. आपल्या बहिणीला मारहाण करीत असलेल्या मेव्हण्यावर दहा वर्षाच्या मुलाने चाकूने सापसप वार केल्याने त्याचा मृत्यू झाला.
सागर मनोहर उमरखाने असें (३५) असे मयत इसमाचे नाव आहे. सागर आपली पत्नी लता आणि चार मुलांबरोबर गुजरातमधील पोलापूर जिल्ह्यातील धानुका येथे राहत होता. सागर दारू पिऊन दररोज करीत असलेल्या मारहाणीला वैतागून लता आपल्या माहेरी वसई रेल्वे स्टेशननजीक असलेल्या वाघरी पाडा येथे आपल्या वडिलांकडे आली होती.
रविवारी दुपारी सागर गुजरातहून लताला भेटायला आला होता. दारुच्या नशेत असलेल्या सागरचे लताशी भांडण झाले. चिडलेल्या सागरने लताला मारहाण सुुरु केली. त्यावेळी घरात असलेला लताचा दहा वर्षांचा भाऊ तिला सोडवायला मध्ये पडला. मात्र, सागरने त्यालाही मारहाण करायला सुरुवात केली. इतकेच नाही तर सागरने लताचा गळा दाबून तिला मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतापलेल्या लताच्या भावाने घरातील चाकूने सागरवर वार केले. जखमी सागरला हॉस्पीटलमध्ये नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)

सागरच्या हत्येप्रकरणी माणिकपूर पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन भिवंडी येथील बाल सुधारगृहात पाठवून दिले. आरोपी मुलाची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. ही हत्या पूर्वनियोजित नसून सागर लताला मारत असल्याने संतापाच्या भरात त्या मुलाकडून हे कृत्य घडल्याचे तपासात उजेडात आले आहे.

Web Title: The murder of a 10-year-old boy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.