१० महिन्यांपासून फरार आरोपीला अटक; आचोळे पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 04:17 PM2024-02-25T16:17:32+5:302024-02-25T16:17:54+5:30
हे हत्याकांड प्रेमप्रकरणातून झालेल्या वादातून घडले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.
नालासोपारा (मंगेश कराळे) :- हत्येच्या गुन्ह्यात मागील १० महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला शनिवारी अटक करण्यात आचोळे पोलिसांना यश मिळाले आहे. नालासोपारा येथील चहाच्या दुकानात १७ मे २०२३ मध्ये शिवम मिश्रा, किसन झा (१८) आणि रौनक तिवारी (१८) या तीन मित्रांमध्ये हाणामारी झाली होती. या मारहाणीत तिघेही जखमी झाले होते. त्यावेळी रौनक तिवारी याचा मृत्यू झाला होता. तर किसन झा याच्यावर मुंबईच्या शताब्दी रुग्णालयात तर शिवम दुबे याच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर उपचारादरम्यान किसन झा याचाही मृत्यू झाला होता. ही हत्या शिवम दुबे यानेच केल्याचे आचोळे पोलिसांनी संशय असल्याने त्याला गुन्ह्यात संशयित आरोपी केले होते. तसेच हे हत्याकांड प्रेमप्रकरणातून झालेल्या वादातून घडले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.
संशयीत आरोपीने अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश, जिल्हा सत्र न्यायालय वसई तसेच उच्च न्यायालय, मुंबई येथे अटकपूर्व जामिन मिळणेकामी अर्ज दाखल केला होता. गुन्ह्यात उत्कृष्ट तपास अथंग प्रयत्न करुन प्राप्त केलेले भौतिक, तांत्रिक, परीस्थितीजन्य पुरावे तसेच प्रथमदर्शनी साक्षीदार या बाबी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्याने न्यायालयाने आरोपीचा अटकपूर्व जामिन अर्ज नामंजूर केला. त्यानंतर शनिवारी दोन स्वतंत्र पथक तयार करुन आरोपीचा शोध घेवुन त्याला नालासोपारा पूर्वेकडील स्टेशन परिसरातून ताब्यात घेतले. त्याचेकडे तपास केल्यावर सदरचा गुन्हा हा त्यानेच केल्याचे भक्कम पुरावा प्राप्त झाल्याने आरोपी शिवम मिश्रा (२०) याला १० महिन्याच्या कालावधीनंतर हत्येच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई पोलीस उपायुक्त पोर्णिमा चौगुले-श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने-पाटील यांचे मार्गदर्शनाखाली आचोळ्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार , पोलीस निरीक्षक (गुन्हे) विवेक सोनवणे, पोलीस हवालदार आनंदा चौरे, मोतीराम गारे, राहुल मुळे, स्वाती माने, सागर वाकचौरे, शरद उगलमुगले, बाळू आव्हाड यांनी केली आहे.