प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या, तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 03:19 AM2018-07-29T03:19:04+5:302018-07-29T03:19:21+5:30
विरार : शहरातील पश्चिमेला असणाऱ्या एम.बी स्टेटमध्ये राहणाºया योगेश राऊत (३५) याच्या पत्नीनेच सुपारी देऊन हत्या घडविल्याचा प्रकार गुरु वार रात्री घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी पत्नीसह दोन आरोपींना अटक केली असून आणखी एक जण फरार आहे.
एम.बी. स्टेट या परिसरात गीता अपार्टमेंट मध्ये पत्नी अश्विनी राऊत हिच्या सोबत तो वास्तव्यास होता. पत्नीचे प्रेम संबध समजल्यावर त्यांच्यात रोज भांडण होऊ लागली. त्याचा राग मनात धरुन तिने आपल्या प्रियकराला हाताशी धरून नवºयाची सुपारी दिली.
अर्नाळा पोलीस रात्री गस्तीवर असताना त्यांना एका दुचाकी वरून मोठे गाठोडे नेताना दोन इसम दिसले. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने व त्या गाठोड्यामध्ये चोरीचा मुद्देमाल असल्याचा संशय आल्याने त्यांनी त्यांचा पाठलाग केला. पोलीस मागावर असल्याने गडबडीमध्ये त्यांची दुचाकी एका ठिकाणी चिखलात अडकली त्यामुळे त्यांच्या जवळते गाठोडे खाली पडले तेव्हा दुचाकीवरील दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले. त्यानंतर पोलिसांनी गाठोडे उघडून पहिले तर त्यांना योगेशचे हात-पाय व गळ्याला ओडणीने बांधलेला मृतदेह सापडला असे पोलीस उपअधीक्षक जयवंत बजवले यांनी लोकमतला सांगितले.
पोलिसांनी पत्नी अश्विनीकडे चौकशी केली असता आधी तिने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली मात्र नंतर ती बोलती झाली. आरोपींवर कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून एका आरोपीचा पोलीस तपास करत आहेत. पती झोपलेला असताना त्याला मारून टाकले व दीड लाखाला पतीची सुपारी दिली असल्याचे चौकशीमध्ये समोर आले आहे.