नालासोपा-यातील खुनाचा उलगडा , आणखी दोघांची हत्या करण्याचा होता डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 12:44 AM2017-11-09T00:44:31+5:302017-11-09T00:44:33+5:30

नालासोपा-यात हत्या झालेल्या अनोळखी व्यक्तीचा छडा लावून त्याच्या तीन मारेक-यांना नालासोपारा पोलिसांनी अटक केली आहे

The murder of Nalasopa, the murder of the other two, was to kill | नालासोपा-यातील खुनाचा उलगडा , आणखी दोघांची हत्या करण्याचा होता डाव

नालासोपा-यातील खुनाचा उलगडा , आणखी दोघांची हत्या करण्याचा होता डाव

Next

वसई : नालासोपा-यात हत्या झालेल्या अनोळखी व्यक्तीचा छडा लावून त्याच्या तीन मारेक-यांना नालासोपारा पोलिसांनी अटक केली आहे. या तिघांनी आणखी दोनजणांची हत्या करण्याचा कट रचला होता. मात्र, त्याआधीच त्यांना अटक झाल्याने दोन जीव वाचले आहेत.
पश्चिमेकडील हनुमान नगरातील एका इमारतीमधील एका खोलीत कुजलेल्या अवस्थेत एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह २८ आॅक्टोबरला आढळून आला होता. या इसमाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. मात्र, मृत इसम अ़नोळखी असल्याने कोणतेही धागेदारे नसतांना त्याची ओळख पटवून त्याच्या मारेकºयांना अटक केली आहे.
या खुनाचा तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक भरत जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, उपनिरीक्षक सुहास कांबळे, महेश चव्हाण, सिद्धेश शिंदे, हवालदार प्रकाश साईल, संतोष सुर्वे, रुस्तम राठोड, हर्षद चव्हाण, अश्विन पाटील यांच्या पथकाने मृत व्यक्तीची ओळख पटविली. सफात अली असगर अली (५५) असे मृत इसमाचे नाव असून तो मानखुर्द येथील रहिवासी असल्याची महत्वाची माहिती हाती लागल्यानंतर नालासोपारा पोलिसांनी त्याच्या मारेकºयांच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर अनेक धक्कादायक गोष्टी उजेडात आल्या.
दीपक लंगडा (३५), प्रजापती (४५) आणि विजय चौहान (२०) या मारेकºयांना मुंबईच्या मानखुर्द परिसरातून अटक करण्यात आली. त्यांनी दिलेल्या जबानीत सफात अली हा त्यांचा साथीदार होता. चौघेही वेश्याव्यवसायासाठी मुली पुरवण्याचा व्यवसाय करीत. चौघांनी एका व्यापाºयाला लुटून ठार मारण्याचा कट रचला होता. त्यानंतर त्यांना सिमकार्ड पुरवणाºयाचीही हत्या ते करणार होते. मात्र, सफातने व्यापाºयाला लुटून आपण एकटेच मारणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे लुटीतील हिस्सा मिळणार नसल्याने दिपक, प्रजापती आणि विजय यांनी सफातला ठार मारण्याचा बेत रचला. तिघांनी त्याला मुलगी विकत देतो असे सांगून नालासोपाºयातील हनुमान नगरात आणले होते. तेथील एका इमारतीतील बंद असलेल्या खोलीत चौघे दारू प्यायले. तिघांनी सफातच्या दारूमध्ये गुंगीचे औषध मिसळले होते. तो बेशुद्ध पडताच त्याची हत्या करून त्यांनी पळ काढला होता. तिघांनी माहिम येथील व्यापाºयाला लुटून त्याची हत्या करण्यासोबतच सीमकार्ड देणाºयाची रेल्वे रुळांवर नेऊन हत्या करण्याचा कट रचला होता. मात्र, त्याआधीच पोलिसांनी तिघांना जेरबंद केल्याने दोघांचे जीव वाचले.

पुरावा नसतांना तपास चौघेही होते ‘दलाल’
कोणताही पुरावा नसतांना तपास पथकाने मृताची ओळख पटवली व त्याच्या तीन मारेकºयांना अटक केली. ते चौघेही देहविक्रयासाठी मुली आणि तरुणी पुरविण्याचा गोरखधंदा करीत होते. एका व्यापाºयाला लुटून त्याची हत्या करण्यावरून त्यांच्यात वाद झाला. व त्याचे पर्यवसन तिघांनी या मयताचा खून करण्यात झाले, असे तपासात निष्पन्न झाले.

Web Title: The murder of Nalasopa, the murder of the other two, was to kill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.