सीसीटीव्हीमुळे जेरबंद झाला मयूरीचा खुनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2019 11:41 PM2019-05-01T23:41:05+5:302019-05-01T23:41:16+5:30

दुसऱ्याशी प्रेम जुळल्याचे सांगताच केले वार

The murderer was murdered due to CCTV | सीसीटीव्हीमुळे जेरबंद झाला मयूरीचा खुनी

सीसीटीव्हीमुळे जेरबंद झाला मयूरीचा खुनी

googlenewsNext

नालासोपारा : विरार पूर्वेकडील साईनाथ पेट्रोल पंपाच्या जवळील वैष्णवी अपार्टमेंटमध्ये रूम नंबर बी/३०२ मध्ये राहणाऱ्या २७ वर्षीय मयुरी महेश मोरे हीची शनिवारी संध्याकाळी घरी एकटी असताना चाकूच्या साहयाने गळा चिरून हत्या झाली होती. विरार पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत तपासाला सुरु वात केली होती. पण तपासादरम्यान परिसरात लावलेल्या सीसीटीव्हीमुळे खुनाचा गुन्हा २४ तासात उलगडण्यात पोलिसांना यश आले आहे. सदर हत्या ही प्रेमप्रकरणामुळे झाली आहे. मयुरीची हत्या करणाऱ्या आरोपी अमोल गणपत औधारे (२८) याला पोलिसांनी अटक केले आहे.

मयुरीची हत्या झाल्यानंतर पती महेशने विरार पोलिसांत तक्रार दिल्यावर पंचनामा करण्यासाठी पोलिसांनी घरी धाव घेऊन सीसीटीव्हीचे फुटेज पाहिल्यानंतर खून झालेल्या दिवशी २७ ला अनोळखी एक जण रात्री ८ वाजता घरी येऊन गेल्याचे व दुसऱ्या दिवशी २८ ला सकाळी ९ वाजून २२ मिनिटांनी तोच अनोळखी तरुण सीसीटीव्ही कॅमेºयामध्ये कैद झाल्याचे दिसले. पोलिसांनी महेशजवळ विचारपूस केल्यावर मयुरीच्या कामावरील एक तरुण नेहमी घरी ये-जा करायचा ही माहिती मिळाल्यावर त्याचे नाव व पत्ता घेऊन त्या दिशेने तपासाला सुरु वात केली. नालासोपारा येथे राहणाºया अमोल गणपत औधारे (२८) याने हत्या केली असल्याचा पोलिसांना संशय आला. ते त्याच्या मागावर होते आणि त्याला बोरिवली येथून पकडण्यात आले. तेव्हा त्याने धक्कादायक अशी माहिती दिली की, हत्येच्या दिवशी घरी गेल्यावर मला तू भेटायचे नाही, माझ्या घरी येऊ नकोस, दुसºया इसमासोबत माझे प्रेमसंबंध जुळलेले आहे असे ती बोलल्यावर रागाच्या भरात त्याने तिच्या गळ्यावर चाकूने वार केले.

मयुरीची हत्या झाल्यानंतर सीसीटीव्हीच्या आधारे फुटेज प्राप्त करून तपासाला सुरु वात करून पतीकडूनही माहिती मिळाल्यावर आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची टीम बनविण्यात आली होती. आरोपी अमोल गणपत औधारे याला बोरीवली येथून अटक केली असून वसई न्यायालयात हजर केल्यावर पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. - अनिल दबडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विरार पोलीस ठाणे

Web Title: The murderer was murdered due to CCTV

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.