‘नोटाबंदीने जनतेचे झाले हाल’

By Admin | Published: January 10, 2017 05:36 AM2017-01-10T05:36:01+5:302017-01-10T05:36:01+5:30

नोटबंदीमुळे शेतमजूर, शेतकरी, दुकानदार तसेच सर्वसामान्य जनतेला होत असलेल्या त्रासाच्या निषेधार्थ सोमवारी डहाणू तालुका राष्ट्रवादी

'Nabbedi people are dead' | ‘नोटाबंदीने जनतेचे झाले हाल’

‘नोटाबंदीने जनतेचे झाले हाल’

googlenewsNext

डहाणू : नोटबंदीमुळे शेतमजूर, शेतकरी, दुकानदार तसेच सर्वसामान्य जनतेला होत असलेल्या त्रासाच्या निषेधार्थ सोमवारी डहाणू तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आमदार आनंद ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा काढण्यात आला. या वेळी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांना निवेदन दिले.
काळा पैसा नष्ट करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून रद्द केल्या आहेत. परंतु दुर्दैवाने एवढा महत्वाचा आर्थिक निर्णय घेण्याअगोदर त्यानंतर होणाऱ्या परिस्थितीची कोणतीही पूर्वतयारी न केल्या ने देशभरातील जनतेला प्रचंड आर्थिक त्रास व हाल सोसावे लागत आहे, असे वक्तव्य आमदार आनंद ठाकूर यांनी सभेत व्यक्त केले. राष्ट्रवादीच्या या मोर्चाची सुरुवात डहाणू स्टेशनपासून झाली. यात तालुका अध्यक्ष राजेश पारेख, माजी नगराध्यक्ष मिहीर शाह, शहर अध्यक्ष शमी पीर, नगराध्यक्ष शर्मिला पाटील सहभागी झाले होते.

Web Title: 'Nabbedi people are dead'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.