नालासोपा-यात गुन्हे वाढले, २४ हत्या, ८७ बलात्कार, ३२५ अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 02:54 AM2018-02-08T02:54:05+5:302018-02-08T02:54:13+5:30
नालासोपारा आणि तुळींज पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्रात एक वर्षात अकरा हजार गुन्ह्यांची नोंद झाली आहे. या सगळया घटनांमुळे पालघर पोलिसांची प्रतिमा दिवसेंदिवस मलिन झाले आहे.
- संजू पवार
वसई : तालुक्यातील नालासोपारा आणि तुळींज पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्रात एक वर्षात अकरा हजार गुन्ह्यांची नोंद झाली आहे. या सगळया घटनांमुळे पालघर पोलिसांची प्रतिमा दिवसेंदिवस मलिन झाले आहे.
तालुक्यातील गुन्हेगारीचे आकडेवारी पाहता पोलीस यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. नालासोपारा आणि तुळींज परिसरातील गुन्ह्याची आकडेवारी पाहता. नालासोपारा येथे राहणारा नागरिक ग्रामस्थ सुरक्षित आहे. काय असा सवाल विचारला जात आहे. केवळ नालासोपारा आणि तुळींज परिसरात २४ हत्या, ८७ बलात्कार, ३२५ अपहरण, १२६ विनयभंग ४५२ चोरी, २६३ वाहन चोरी, २९५ हाणामारीचे, १५ प्राणघातक हल्ले घडल्याची नोंद झाली आहे. ही आकडेवारी मागील काही वर्षापेक्षा सर्वाधिक आहे. नालासोपारा परिसरात नालासोपारा आणि तुळींज ही दोन पोलीस स्थानके आहेत त्यात २५० पोलीस कर्मचारी सेवेत आहेत. मात्र, तरी गुन्हेगारीचा वाढता आहे. नालासोपारा परिसरात मोठ्या प्रमाणात आम्ली पदार्थांची विक्री होत असल्याचं संशय व्यक्त होत आहे. अनेक गुन्हे तपासाच्या चक्रात अडकले आहेत. पोलीस अधिकारी कर्मचारी संख्या कमी असल्याचे कारण पुढे करत आपली बाजू साभाळत आहेत.
>नालासोपारा पोलीस ठाणे
गुन्हेगारीचे आकडे
२०१६ - २०१७
हत्या ०२ - ०४
प्राणघातक ०१ - ०३
हल्ले
चोरी ६३ - ९१
बलात्कार ०६ - १२
अपहरण २६ - २५
वाहन चोरी ४३ - ६८
विनयभंग २६ - २५
मारपीट १८ - ३६
>तुळिंज पोलीस ठाणे
गुन्हेगारीचे आकडे
२०१६ - २०१७
हत्या ०८ - १२
प्राणघातक ०२ - ०९
हल्ले
चोरी १३३ - १३५
बलात्कार ४० - २९
अपहरण १३४ - १४०
वाहन चोरी ७२ - ८०
विनयभंग ४२ - ५६
मारपीट १३६ - १०७
>पिडीत लोकांच्या तक्र ारी आल्या की तक्र ारीवरून गुन्हे नोंदवावी लागतात. नालासोपारा परिसरात गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस बळ वाढविण्यात आले आहे. पोलीस अधिक कार्यक्षमतेने काम करत आहेत. गस्त वाढविण्यात आल्या आहेत. तुळींज स्थानिक गुन्हे शाखेला उत्कृष्ट तपास यंत्रणा म्हणून पुरस्कार मिळाला आहे. पोलीस यंत्रणा सर्वोपरी कार्य करत आहे.
- राजतिलक रौशन,
अतिरिक्त पोलीस अधीक्षक, वसई