Nalasopara: सोनसाखळी चोरी करणाया सराईत आरोपीला अटक, ७ गुन्हयांची उकल करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट दोनला यश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 07:18 PM2023-04-12T19:18:10+5:302023-04-12T19:18:30+5:30
Crime News: गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलीस अधिकारी आणि त्यांच्या टीमने सराईत सोनसाखळी चोरी करणाऱ्या ईराणी आरोपीला पकडले आहे.
- मंगेश कराळे
नालासोपारा - गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलीस अधिकारी आणि त्यांच्या टीमने सराईत सोनसाखळी चोरी करणाऱ्या ईराणी आरोपीला पकडले आहे. त्याच्याकडून ७ गुन्ह्यांची उकल करून लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळाल्याची माहिती गुन्हे विभागाचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली आहे.
वसईच्या बंगली रोडवरील रो हाऊस नंबर ५, शक्ती विलाज येथे राहणाऱ्या किरण अशोक मगिया (६२) या सुनेबरोबर दुचाकीवरून १० फेब्रुवारीला राहते घरातुन जैन मंदिर या ठिकाणी कार्यक्रमासाठी जात पहाटे ६ वाजता जात होत्या. माणिकपूर नाका शाओमी एमआयचे शोरुम समोर दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातून सोन्याची चैन जबरीने खेचून पळून गेले. माणिकपूर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. पोलीस आयुक्तालयाचे हद्दिमध्ये सतत होणा-या चैन स्नॅचिंग गुन्हयांना आळा घालणेबाबत व घडलेले गुन्हे उघडकीस आणणेबाबत वरिष्ठांनी मार्गदर्शन व सुचना दिल्या होत्या.
त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट दोनचे अधिकारी व अंमलदार यांनीे घडणाया प्रत्येक चैन स्नॅचिंग गुन्हयाचे ठिकाणी प्रत्यक्ष भेट देवून घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजचे परिक्षण केले होते. चैन स्नॅचिंग गुन्हयातील आरोपीत याचे फुटेज परिक्षण व गुप्त बातमीदारामार्फत प्राप्त महितीच्या आधारे आरोपी अब्बास अमजद ईराणी (२४) यास निष्पन्न करुन आरोपीत हा आंबिवली ईराणी वस्तीतील रहीवासी आहे. यापुर्वी ईराणी वस्तीमध्ये आरोपीत पकडणेस गेलेल्या तपास पथकावर हल्ला होण्याच्या ब-याच घटना घडलेल्या असतानाही सर्व बाबींची योग्य सांगड घालुन सापळा करवाई करुन कोणताही कायदा व सुव्यवस्थेची प्रश्न निर्माण होणारी कोणतीही घटना न घडू देता त्याला ४ एप्रिलला ताब्यात घेण्यात आले. अटक आरोपीकडून तपासादरम्यान चैन स्नॅचिंगचे ७ गुन्हे उघडकीस आणुन चोरी करणेकरीता वापरलेल्या दुचाकीसह गुन्हयात चोरीस गेलेले ८७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकुण ३ लाख ३१ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अटक आरोपीत याचे विरोधात संघटीत गुन्हेगारीचे २ गुन्हे, जबरी चोरीसह दुखापतीचे २१ गंभीर गुन्हे ठाणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) अमोल मांडवे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा वसई युनिट दोनचे पोलीस निरीक्षक शाहुराज रणवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे, सागर शिंदे, सहाय्यक फौजदार रमेश भोसले, मंगेश चव्हाण, संजय किसन नवले, पोलीस हवालदार चंदन मोरे, महेश पागधरे, सचिन पाटील, जगदिश गोवारी, रमेश आलदर, दादा आडके, सुधीर नरळे, प्रशांत ठाकुर, अमोल कोरे, बापु पवार, राजेश पद्मने, महेंद्र शेट्ये, संतोष चव्हाण यांनी केली आहे.