नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 10:32 PM2020-02-24T22:32:33+5:302020-02-24T22:32:40+5:30
अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या ८ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
नालासोपारा : शहरामध्ये पूर्व आणि पश्चिम परिसरात सध्या गर्दुल्ल्यांची संख्या वाढती आहे. या गर्दुल्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नालासोपारा पोलिसांनी पावले उचलत पेट्रोलिंग वाढवली आहे. अशाच गस्तीदरम्यान रविवारी पश्चिमेकडील परिसरात अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या ८ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
रविवारी संध्याकाळी नालासोपारा पश्चिमेकडील श्रीप्रस्था येथील यशवंत गौरव परिसरातील नाकोडा हाईट्स बिल्डिंगच्या गल्लीमध्ये ईसरार नियाज अहमद खान (२५), विवेक कैलास विश्वकर्मा (२२), रवी नारायण राठोड (२५), दिलीप शैलेंद्र यादव (२५) हे अंमली पदार्थांचे सेवन करताना आढळले.
त्याच परिसरातील यशवंत गौरव रिक्षा स्टॅण्ड जवळील ड्रीम टॉवरच्या गल्लीतील झाडीमध्ये समीर चंद्रकांत जाधव (२६), अजय वर्मा (२३), अक्षित नागेश पाटील (२१) आणि तोहीद आशिफ खान (२२) हे अंमली पदार्थांचे सेवन करताना सापडले आहे.
नालासोपाºयात अनेक ठिकाणी ब्राऊन शुगर, गांजा, चरस विकणाºया टोळ्या कार्यरत असून ते विकत घेण्यासाठी तरुण मोठ्या संख्येने ठाणे, कल्याण, उल्हासनगर, मुंबई येथून नालासोपाºयात येतात. पोलिसांनी अनेकदा कारवाई करूनही यावर अंकुश लावण्यात त्यांना अपयश आले आहे.
भंगार गाड्या गर्दुल्ल्यांचा अड्डा
शहरातील अनेक रस्त्यांच्या किनाºयालगत मोठ्या भंगार वाहनात गर्दुल्यांचा अड्डा बनला आहे. रात्रीच्या वेळी याच गाड्यांमध्ये बसून गर्दुल्ले नशा करतात. हेच गर्दुल्ले रात्रीच्या वेळी येणाºया जाणाºया लोकांना निशाणा बनवून लुटतात. विरोध केला तर हे गर्दुल्ले नशेच्या धुंदीत जीवघेणा हल्ला करण्यास मागेपुढे पाहत नाही. वसई तालुक्यातील पोलीस ठाण्यात गर्दुल्यांकडून चोºया आणि मारामारीचे अनेक गुन्हे समोर आले आहेत.
गर्दुल्यांच्या अनेक तक्र ारी पोलीस ठाण्यात येत आहे. रविवारी श्रीप्रस्था परिसरात गर्दुल्यांच्या वावर वाढल्याने पेट्रोलिंगला गेलेल्या पोलिसांनी आठ जणांना अंमली पदार्थ सेवन करताना अटक केली आहे. - श्रीरंग गोसावी, सहाय्यक पोलिस निरीक्षक, नालासोपारा