नालासोपारा शहर मादक पदार्थ आणि गांजाच्या विळख्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 02:37 AM2018-01-21T02:37:46+5:302018-01-21T02:38:00+5:30
नालासोपारा शहरात तीन ठिकाणी हुक्का पार्लर सुरु आहे. तसेच शहरात मादक पदार्थ आणि गांजाची खुलेआम विक्री केली जात असल्याने तरुण पिढीला व्यसनाधिन करणाºया या अवैध धंद्यावर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदा गुंजाळकर यांनी केली आहे.
वसई : नालासोपारा शहरात तीन ठिकाणी हुक्का पार्लर सुरु आहे. तसेच शहरात मादक पदार्थ आणि गांजाची खुलेआम विक्री केली जात असल्याने तरुण पिढीला व्यसनाधिन करणाºया या अवैध धंद्यावर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदा गुंजाळकर यांनी केली आहे.
नालासोपारा पूर्वकडील सनशाईन मॉल, गॅलेक्सी हॉटेल आणि ब्रॉड वे मॉलमधील निलम पंजाब हॉटेलमध्ये खुलेआम हुक्का पार्लर सुरु आहे. निलम पंजाब मधील हुक्का पार्लरवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना मारहाणही करण्यात आली होती. तसेच काही महिन्यांपूर्वी याठिकाणी आगही लागली होती. त्यामुळे या हुक्का पार्लरवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
नालासोपारा शहरात गेल्या सहा महिन्यात मादक पदार्थ आणि गांजा विकणाºया अनेक जणांना अटक करण्यात आली आहे. हनुमान नगरात ड्रग्जची तस्करी करणाºया आरोपीला मुद्देमालासह अटक करण्यात आली होती. तर चार महिन्यात गांजा विकणाºया चार महिलांनाही अटक करण्यात आली होती. शहरात नायजेरियन आणि बांगलादेशीय नागरीकांची बेकायदा वस्ती आहे. यातील बरीचशी माणसे ड्रग्जच्या धंद्यात गुंतलेली आहेत. त्यामुळे नालासोपारा शहरात मादक पदार्थ आणि गांजाची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे.
हुक्का पार्लरच्या माध्यमातून, पान टपºयांवर सध्या मादक द्रव्य आणि गांजा विकला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. हुक्का पार्लरकडे आकर्षित होऊन तरुणी पिढीला मादक पदार्थ, चरस गांजा, ब्राऊन शुगर आदी मादक द्रव्यांचे सेवन करण्याचे व्यसन लागले आहे. त्यामुळे येथील हुक्का पार्लर बंद करून तरुण पिढीचे आयुष्य उध्वस्त होण्यापासून वाचवावे, अशी मागणी पोलीस अधिक्षकांकडे करण्यात आली आहे.