धक्कादायक! भुंकणाऱ्या कुत्रीवर वस्तऱ्याने केले वार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2020 01:20 AM2020-10-10T01:20:53+5:302020-10-10T01:21:00+5:30
नालासोपारा येथील संतापजनक घटना; आरोपीविरोधात तुळिंज पोलिसांत गुन्हा
नालासोपारा : पूर्वेकडील परिसरात रस्त्यावर भुंकणाऱ्या कुत्रीवर एका आरोपीने वस्तºयाने हल्ला केल्याची अमानुष घटना सोमवारी संध्याकाळी घडली. पशुकल्याण अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून तुळिंज पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नालासोपारा पूर्वेकडील शिर्डीनगर, गालानगर परिसरात एक कुत्री वारंवार भुंकत होती. त्याचा राग येऊन आरोपी तस्लीम अन्सारी या माथेफिरूने त्या कुत्रीवर सोमवारी सायंकाळी ५ वाजता रस्त्यावरच धारदार वस्तºयाने वार केले. त्यात कुत्रीच्या बरगड्यांना मोठी जखम होऊन तिचे पोट कापले गेले आहे. ही घटना पाहिल्यावर आसपासच्या लोकांनी या कुत्रीच्या जखमेवर हळद टाकून प्रथमोपचार केले.
मानद पशुकल्याण अधिकारी राजेश पाल यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी प्राणीमित्र इशिका जैस्वाल हिच्या मदतीने या जखमी कुत्रीला दळवी चॅनेल हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
रुग्णालयात डॉ. कुलदीप मुकणे यांनी गंभीर जखमी कुत्रीवर उपचार केले आहेत. याबाबत पाल यांनी गुरुवारी तुळिंज पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार केली. त्यानुसार आरोपी तस्लीम अन्सारी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा सर्व प्राणीमित्रांनी निषेध केला आहे. अन्सारीवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.