coronavirus : नालासोपारा, विरारला ८ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 04:56 AM2020-04-27T04:56:31+5:302020-04-27T04:56:42+5:30
यात ८ महिन्याच्या बाळाचा समावेश आहे. त्यामुळे बाधित रुग्णांची संख्या ११८ झाली आहे.
नालासोपारा/वसई : नालासोपारा आणि विरार येथे रविवारी ८ नवे रुग्ण आढळले. यात ८ महिन्याच्या बाळाचा समावेश आहे. त्यामुळे बाधित रुग्णांची संख्या ११८ झाली आहे.
धारावी येथे राहणारे कुटुंब अलीकडेच नालासोपारा पूर्व येथे राहायला आले होते. पालिकेला माहिती मिळताच आईवडील आणि बाळाची चाचणी केली. त्यात आई व वडिलांचा रिपोर्ट निगेटिव्ह तर, बाळाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. बाळाला वसई पूर्वेकडील आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल केले आहे. विरार पूर्वेकडील ५२ वर्षीय महिलेला लागण झाली आहे. तसेच ४० वर्षीय पुरुषालाही लागण झाली असून त्याला मुंबईत दाखल केले.
विरार पूर्वेकडील ४३ वर्षीय पत्रकाराचा रिपोर्ट शनिवारी पॉझिटिव्ह आला. रविवारी त्याची पत्नी (४०), आई (६०) आणि वडील (७०) हे तिघेही पॉझिटिव्ह ठरले आहेत. त्यांच्या पत्नीला वसई पूर्वेकडील आयसोलेशन वॉर्डमध्ये तर आई-वडिलांना नालासोपारा पश्चिमेकडील रुग्णालयात दाखल केले आहे
नालासोपारा पूर्वेकडील ३८ वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह, पश्चिमेकडील २७ वर्षीय पुरुषाला लागण झाली.