मतदार यादीतून नाव गायब : श्वेता पाटील-पिंपळे यांचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 02:55 AM2018-12-26T02:55:15+5:302018-12-26T02:55:46+5:30
पालघर नगर परिषदेतील राष्ट्रवादीच्या नगरसेविका डॉ.श्वेता पाटील-पिंपळे यांनी आपले नाव मतदार यादीतून नाव वगळण्याच्या कट हितशत्रूंनी रचल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकाº्यांकडे आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे.
पालघर : पालघर नगर परिषदेतील राष्ट्रवादीच्या नगरसेविका डॉ.श्वेता पाटील-पिंपळे यांनी आपले नाव मतदार यादीतून नाव वगळण्याच्या कट हितशत्रूंनी रचल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकाº्यांकडे आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र ज्या अज्ञात व्यक्तीने हा प्रकार केला आहे त्याच्या विरोधात पोलिसात तक्र ार मात्र दिलेली नाही.
पालघर नगर परिषदेत एकूण 28 नगरसेवकांचे संख्याबळ असून शिवसेनेचे 17 नगरसेवक निवडून आल्याने मागील पाच वर्षांपासून सेनेची सत्ता अबाधित आहे. राष्ट्रवादीचे 10 नगरसेवक तर काँग्रेसची एक नगरसेविका निवडून आली आहे. साधारणपणे 50 हजार मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असून ह्या संख्येत 8 ते 10 हजार मतदारांची वाढ झाली आहे. 2014 च्या निवडणुकीत अल्याळी भागात मोठ्या प्रमाणात बोगस मतदार नोंदणी झाल्याचा प्रकार उघडकीस आल्या नंतर पालघर तहसीलदार कार्यालयातील एका कर्मचार्यांची बदली बोईसर येथे करण्यात आली.
हा लोकशाहीचा खून असून मतदार यादीतून आपले नाव वगळण्याचा कट राजकीय हेतुने रचला असल्याचा आरोप करून सोमवारी आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे ह्यांच्याकडे पाटील यांनी दिला आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तो मंजूर ही केला.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ह्यांच्या वाढदिवसा प्रित्यर्थ राष्ट्रवादीचे गटनेते मकरंद पाटील ह्यांच्या वृंदावन पार्कात लावलेल्या होर्डिंग्ज वरून मकरंद पाटील, डॉ.श्वेता पाटील ह्यांचे फोटो-नावे गायब होणे, डॉ.श्वेता पाटील ह्यांना नगराध्यक्षपद मिळावे ह्यासाठी पक्ष बदलाची चाललेली धावपळ, त्यांचे मतदार यादीतून नावेच गायब करण्याचा प्रकार,असा सायबर गुन्ह्याचा गंभीर प्रकार घडुनही अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्या बाबतची उदासीनता,एकदम 8 ते 10 हजार मतदारांची वाढलेली संख्या हे सारे शंकास्पद आहे. ही नावे वगळण्याची प्रक्रि या मुंबईतून सुरू असून प्रति फॉर्म 400 रु पयांचा दर सुरू असल्याची चर्चाही सुरू आहे.
माझा मतदार यादीतून वगळणी संदर्भात 7 नंबरचा अर्ज आढळून आला व वेळीच हे लक्षात आले नसते तर कदाचित नाव वगळले जाण्याची शक्यता होती.या घटनेचा निषेध म्हणून मी माझा राजीनामा जिल्हाधिकाºया कडे दिला आहे.आणि तो मंजूरही करण्यात आला आहे.
- डॉ. श्वेता मकरंद पाटील,
माजी नगरसेविका