जीएसटीच्या नावाखाली पालिकेच्या शिक्क्यानिशी लूट, अनधिकृत फेरीवाल्यांचा भरणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 12:35 AM2018-11-23T00:35:13+5:302018-11-23T00:35:46+5:30

वसई-विरार महानगरपालिकेने नेमलेले बाजार ठेकेदार शहरातील फेरीवाल्यांकडून वस्तू-सेवा कराच्या (जीएसटी) नावाखाली सरळसरळ लूट करीत आहेत.

 In the name of GST, plunder with the stamp of the municipality, payment of unauthorized hawkers | जीएसटीच्या नावाखाली पालिकेच्या शिक्क्यानिशी लूट, अनधिकृत फेरीवाल्यांचा भरणा

जीएसटीच्या नावाखाली पालिकेच्या शिक्क्यानिशी लूट, अनधिकृत फेरीवाल्यांचा भरणा

Next

वसई : वसई-विरार महानगरपालिकेने नेमलेले बाजार ठेकेदार शहरातील फेरीवाल्यांकडून वस्तू-सेवा कराच्या (जीएसटी) नावाखाली सरळसरळ लूट करीत आहेत. महापालिकेच्या नावाचा आणि शिक्क्याचाही गैरवापर होत असून, या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे.
वसई-विरार शहरातील बाजारमाफियांनी शहरातील मोक्याच्या जागा हडप करून लूट चालवली असताना, आता अधिकृत बाजारातही मोठा आर्थिक गैरव्यवहार होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. वसई-विरार महानगरपालिकेचे फेरीवाला धोरण अद्याप मंजूर नाही. त्यामुळे शहरात अनिधकृत फेरीवाल्यांनी शहर गिळंकृत करण्यास सुरुवात केली आहे. जागोजागी बेकायदा फेरीवाल्यांनी जागा अडवून बाजार मांडला आहे. मात्र अधिकृत बाजारातही गैरव्यवहार होत असल्याची बाब पुढे आली आहे. महापालिकेने १८ ठिकाणी अधिकृत फेरीवाल्यांना परवानगी दिली आहे. त्यांच्याकडून महापालिका ठेकेदारांमार्फत बाजार शुल्क वसूल करीत असते. मात्र ठेकेदार आता महापालिकेच्या नावाने बेकायदा वसुलीही केल्याचे समोर आले आहे.
विरार पूर्व आणि नालासोपारा पश्चिम येथील ठेकेदार फेरीवाल्यांकडून २० ते ४० रु पये दररोज बाजार शुल्क घेतात. ठेकेदारांनी फेरीवाल्यांना दिलेल्या पावतीवर महापालिकेचे नाव आणि शिक्का असतो. धक्कादायक बाब म्हणजे, याच पावतीवर ५ रुपये वस्तू-सेवा कर आकारला जातो. वस्तू-सेवा कराच्या संकेतस्थळावर तपशील तपासला असता, हा वस्तू-सेवा क्रमांक अयोग्य असल्याचे दाखवले जात आहे. बनावट वस्तू सेवा कर क्रमांक दाखवून ही लूट केली जात असल्याची बाब यानिमित्ताने पुढे आली आहे. दररोज हजारो फेरीवाल्यांकडून अवैध वसुली केली जात आहे. या माध्यमातून दररोज हजारो रुपयांची लूट होत असून हा लाखोंचा गैरव्यवहार असल्याचे समोर आले आहे. महानगरपालिकेने १८ ठिकाणी बाजार शुल्क वसुलीचा ठेका विविध ठेकेदारांना दिल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांनी दिली. मात्र फेरीवाल्यांकडून वस्तू-सेवा कर वसूल करण्याची तरतूद नसल्याची माहिती त्यांनी दिली. हा नेमका काय प्रकार आहे त्याची माहिती घेऊन चौकशी केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

नवघर पूर्व येथील फेरीवाल्याना हटवले, गाड्या जप्त
जीएसटीच्या नावाखाली महानगरपालिका ठेकेदारांमार्फत बाजार शुल्क वसूल करीत असताना, नवघर पूर्व येथील फेरीवाल्यांवर गेल्या दोन दिवसांपासून पालिका कर्मचाऱ्यांनी कारवाई करत त्यांना हूसकावून लावले आहे. यात ८ ते १० फेरीवाल्यांचा माल व गाड्या पालिकेच्या कर्मचाºयांनी जप्त करून नेल्याचे आहेत. या ठिकाणीही पालिकेचे ठेकेदार प्रत्येक फेरीवाल्याकडून रोज हद्दीतील वसुली म्हणून १० रूपयांची पावती फाडत असतात.
विशेष म्हणजे या पावतीवर जीएसटी लावला नसला तरी हद्दीतील वसुली कोणत्या क्षेत्रातील व वसुली करणारा कोण याची काहीच माहिती देण्यात आलेली नाही. याबाबत चौकशी केली असता ज्या नवघर पूर्व येथील फेरीवाल्यांकडून पालिकेचे ठेकेदार रोज १० रूपयांची पावती फाडत आहेत, ती जागा ना रेल्वेची आहे ना महानगरपालिकेची. सदर जागा ही मिठागाराची असल्याचे समोर आले आहे. मात्र पालिका ठेकेदार हे सदर पावती स्वच्छतेबाबत घेत असल्याचे सांगण्यात आले.
याबाबत गेली १५ वर्षे नवघर पूर्व येथे तेथे केळी विक्र ी करणाºया लक्ष्मीकांत मिश्रा यांनी सांगितले कि, या मिठागाराला लागून वनविभागाचीही जमीन आहे. प्रत्यक्षात महानगरपालिका येथील फेरिवाल्यांकडून स्वच्छता कर घेऊ शकत नाही. पालिकेचे ठेकेदार जी पावती हद्दीची वसूली करतात, ती हद्दच पालिकेची नाही. आता तर अचानक येथे गाड्या लावू नयेत म्हणून दमदाटी करत आहेत.

अनधिकृत आठवडा
बाजारांवर कारवाई नाही
शहरात जागोजागी अनधिकृत फेरीवाल्यांचे आठवडा बाजार भरवले जात आहेत. या अनधिकृत बाजारातून दररोज लाखो रुपयांचा हप्ता गोळा केला जात आहे. पूर्वी महापालिकेच्या फेरीवाला विभागातर्फेत्यांच्यावर नाममात्र कारवाई केली जात होती.
आता हा विभागच बरखास्त करण्यात आला असून प्रत्येक प्रभागातील प्रभारी साहायक आयुक्तांना याबाबत कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. मात्र त्यांच्यावर कुठलीच कारवाई होत नसल्याने या अनधिकृत आठवडा बाजारांची संख्या वाढतच चालली आहे.

Web Title:  In the name of GST, plunder with the stamp of the municipality, payment of unauthorized hawkers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.