लिटरमागे ७० चा एव्हरेज देणारी नॅनो बाइक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2018 12:28 AM2018-05-01T00:28:07+5:302018-05-01T00:28:07+5:30
डहाणु येथील रु स्तमजी अकादमीतील आॅटोमोबाईल विभागाच्या विद्यार्थ्यांनी ८० सीसी इंजिन वापरु न नॅनो मोटरसायकल बनविली आहे. त्यासाठी साधारण सुुमारे २२ हजार खर्च आला आहे.
बोर्डी : डहाणु येथील रु स्तमजी अकादमीतील आॅटोमोबाईल विभागाच्या विद्यार्थ्यांनी ८० सीसी इंजिन वापरु न नॅनो मोटरसायकल बनविली आहे. त्यासाठी साधारण सुुमारे २२ हजार खर्च आला आहे. प्रति लिटरला ७० किमीचा मिळणारा एव्हरेज ही तिची खासियत आहे.
ही मोटरसायकल हाफ पेडलने आणि सेल्फ स्टार्टने सुरु होते. तिस लाइट, हॉर्नही बसविण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी १५ दिवसात ती तयार केली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या हेतुने रुस्तमजी महाविद्यालयात विविध उपक्र म राबिवले जातात. त्याचाच भाग म्हणुन काही महिन्यापूर्वी १०० फूट बनवलेला पिझ्झा आकर्षणाचा विषय ठरला होता. त्यानंतर त्याचे वाटप हा आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना करण्यात आला होता.
इंधन दर वाढीने सर्व सामान्य जनता होरपळली असल्याने ही सेल्फ स्टार्ट सायकल ग्रामीण भागात आकर्षणाचा विषय ठरली आहे. दरम्यान, या महाविद्यालयातील विद्यार्थी इलेक्ट्रीकल सायकल, बग्गी कार, गो कार्ट यासारखे प्रायोगिक प्रोजेक्ट बनवित असून हे प्रयोग यशस्वी होतील असा विश्वास व्यक्त त्यांनी व्यक्त केला आहे.