राष्ट्रीय पेयजलच्या नळपाणी योजना अर्धवटच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 02:57 AM2018-04-10T02:57:48+5:302018-04-10T02:57:48+5:30
मार्चनंतरच्या पाणीबाणीपासून मुक्त करण्यासाठी तीन वर्षांपासून राष्टÑीय पेयजल योजने अंतर्गत टेटवाळी, उघाणीपाडा, हातणे, उटावली येथील पाच ते सहा नळपाणी योजनेचे काम सुरु आहे.
संजय नेवे
विक्रमगड : तालुक्याला मार्चनंतरच्या पाणीबाणीपासून मुक्त करण्यासाठी तीन वर्षांपासून राष्टÑीय पेयजल योजने अंतर्गत टेटवाळी, उघाणीपाडा, हातणे, उटावली येथील पाच ते सहा नळपाणी योजनेचे काम सुरु आहे. त्यात विहिरीचे काम झाले असून पाण्याच्या टाक्यांचे क ाम, पाईप लाईन व काही किरकोळ कामे रखडलेली आहेत. मात्र, यामुळे पाणी पुरवठ्याची समस्या कायम असल्याने ही कामे कधी पुर्ण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या योजनांची कामे ग्रामपंचायतस्तरावर झालेल्या असून यावर आतापर्यंत लाखो रुपये खर्च झाले आहेत. ही कामे वर्क आॅर्डर प्रमाणे केव्हाच पुर्ण व्हायला हव्या होत्या. मात्र, त्या कोणत्या टप्प्यावर आडल्या आहेत याचा अभ्यास ना जि.प.कडून होत ना त्याच्या तक्रारी ग्रामपंचायतीकडून होत. याबाबत पाणीपुरवठाविभागाचे उप अभियंता आर. कदम यांना विचारणा केली असता या योजनांवर पुर्वी ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत कामे झाली आहेत. त्याबाबत वारंवार सूचना देऊनही त्या पूर्ण होत नसल्याने त्यांचे हस्तातंरण पाणी पुरवठा विभागाला करुन त्या पूर्ण करण्यात येणार असल्याने त्यांनी सांगितले. परंतू हे कधी होणार याबाबत काहीच सागितले नाही.
अशा योजना आखल्या जातात पंरतु प्रत्यक्षात त्याचा लाभ गाव खेडयाना होतो की नाही हे कोणीच पाहत नाही. त्यामुळे या लोकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. तसे वीज बिलान मुळेही तलवाडा, कुज या व अशा योजना बंद आहेत. या बाबतही पाणीपुरवठा विभागने लक्ष देऊन या सर्व योजना कार्यान्यित कराव्या अशी मागणी कॉ. किरण गहला यांनी केली आहे. तालुक्यात दरवर्षी ३५ ते ४० गाव पाडाना पाणी टंचाई जाणवते. या वर्षी तिच परिस्थिती निर्माण होत आहे. तरी पाणीपुरवठा विभागाने लक्ष देऊन टंचाई दुर करावी व टँकरची व्यवस्था करावी विहिरीची पातळी कमी झालेल्या असून यावर उपाययोजना लवकरात लवकर कराव्यात अशी मागणी गहला यांनी केली आहे.
>जनाठेपाड्यात टॅँकरने व टाक्यांद्वारे पाणीपुरवठा सुरु
तलवाडा: ओंदे ग्रुपग्रामपंचात अंतर्गत असलेल्या जनाठेपाडयात भिषण पाणी टंचाईचा सामना ग्रामस्थांंना करावा लागत होता. येथे ६० ते ७० घराची वस्ती आहे. ६५० ते ७०० लोकसंख्या असलेल्या या पाड्यात पाणी टंचाई सदृश्य स्थिती असतांना याकडे शासन व प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात होते.
जनाठे पाडा विक्र मगड शहरा पासुन केवळ चार किलोमीटर अंतरावर आहे. जनाठेपाडा उंच भागात वसलेला आहे. त्यामुळे भुजल पातळी अतिशय खोलवर गेलेली असून. त्यामुळे मार्चपासूनच या पाड्यात तीव्र पाणी टंचाईचा नागरिकांना सामना करावा लागत आहे.
या बाबत पंचायत समिती अधिकाऱ्यांन कडे तक्र ार करून ही प्रशासनाच्यावतीने टँकरची व्यवस्था करण्यात आली नव्हती या बाबत लोकमतमध्ये जनाठेपाडयात तीव्र पाणी टँचाई या मंथळ्याखाली बातमी प्रसिद्ध होताच पंचायत समिती व ग्रामपंचायत प्रशासनाने गंभीर दखल घेत या पाड्यात टाक्यांनद्वारे व टँकर द्वारे पाणी पुरवठाची सोय सुरु केली आहे.
त्याचप्रमाने ग्रुप ग्रामपंचात ओंदेच्या सरपंच चंद्रकला खुताडे यानी माहिती देताना सांगितले की, उन्हाळा संपे पर्यंत उघाणीपाड्यातून तातपुरता पाईप लाईनद्वारे जानाठेपाडा येथील रहिवाशाना पाण्याची सोय करून देण्यात आली आहे.
दरवर्षी या पाड्याला पाणी टंचाई जाणवते. प्रशासनाने यावर अपूर्ण असलेली पाणी पुरवठा योजना त्वरीत पूर्ण करून पाणी टंचाईवर कायमची उपाय योजना करावी.
- सुनील विष्णू कनोजा, ग्रामस्थ, जनाठेपाडा
जनाठेपाड्यापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या विहिरीत टॅँकर व टाक्यांद्वारे पाणी सोडले जात आहे.