भूमिपुत्रांसाठी आगरीसेनेचा रास्ता रोको, राष्ट्रीय महामार्ग अर्धा तास ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 02:35 AM2019-02-09T02:35:57+5:302019-02-09T02:36:29+5:30

भूमीपूत्रांच्या न्यायहक्कासाठी ‘अभी नही तो कभी नहीं’ चा नारा देत आगरी सेना भूमिपूत्रांसोबत शुक्र वारी राष्ट्रीय महामार्गावर धडकली. हजारो भूमिपूत्र या आंदोलनात सहभागी झाले होते. जिल्ह्यातील विविध पक्षांनी या महामार्ग रास्ता रोकोला जाहिर पाठींबा दर्शवला होता.

the national highway jammed for half an hour | भूमिपुत्रांसाठी आगरीसेनेचा रास्ता रोको, राष्ट्रीय महामार्ग अर्धा तास ठप्प

भूमिपुत्रांसाठी आगरीसेनेचा रास्ता रोको, राष्ट्रीय महामार्ग अर्धा तास ठप्प

Next

वसई  - भूमीपूत्रांच्या न्यायहक्कासाठी ‘अभी नही तो कभी नहीं’ चा नारा देत आगरी सेना भूमिपूत्रांसोबत शुक्र वारी राष्ट्रीय महामार्गावर धडकली. हजारो भूमिपूत्र या आंदोलनात सहभागी झाले होते. जिल्ह्यातील विविध पक्षांनी या महामार्ग रास्ता रोकोला जाहिर पाठींबा दर्शवला होता.
पालघरचा विकास हा भूमीपुत्रांच्या जागेवरच झाला आहे. मात्र, स्थानिक भूमिपूत्र नेहमीच दुर्लक्षीत राहिले. त्यांच्या विविध मागण्या पूर्ण होत नसल्याने आगरी सेनेच्या वतीने राष्ट्रीय महामार्गावर शुक्र वारी सकाळी ११ वाजता शिरसाड, विरार फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी आंदोलकांनी पालिका प्रशासनाचा सुरु असलेला भोंगळ कारभार, वाढीव घरपट्टी, मच्छीमार बांधवांचे ओएनजीसीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई, वीज समस्या, पाणी समस्या, नोकऱ्यांमध्ये आरक्षण, उद्योग व्यवसाय, रु ग्णालय, महाविद्यालय, नारंगी उड्डाणपूल, बांधकामावर पालिकेचे दुर्लक्ष अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलकांनी मुंबई-अहमदाबाद महामार्ग अर्धा तास रोखून धरला होता. यामुळे महामार्गावर लांबचलांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

येथे कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी वसईचे प्रांताधिकारी डॉ. दीपक क्षीरसागर, तहसीलदार किरण सुरवसे यांनी आंदोलकांची भेट घेऊन निवेदन स्विकारले. जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून पालघर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत बैठक बोलावून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे त्यांनी सांगितल्या. त्या नंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, मागण्या पुर्ण न झाल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल असे आगरीसेनेचे कैलास पाटील यांनी संगीतले.
आगरी सेनेचे प्रमुख राजाराम साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनामध्ये विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांसह हजारोंच्या संख्येने वसई, विरार, पालघर परिसरातील नागरिक सहभागी झाले होते.


विविध पक्षांचाही पाठींबा : आगरी सेनेचे प्रमुख राजाराम साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनामध्ये विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांसह हजारोच्या संख्येने वसई, विरार, पालघर परिसरातील नागरिक सहभागी झाले होते. यावेळी आगरी सेना जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, कैलास पाटील, ‘मी वसईकर’चे मिलिंद खानोलकर, शिवसेनेचे दिलिप पिंपळे व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अशा आहेत मागण्या
पालघर जिल्ह्यात येऊ घातलेल्या सरकारी विविध प्रकल्पात भूमिपूत्रांना तृतीय व चतुर्थ श्रेणीच्या नोकºयांमध्ये आरक्षण, ओ.एन.जी.सी.च्या सागरी सर्वेक्षणामूळे दोन महिने मच्छीमारी बंद करण्यात आली आहे, त्याचा मोठा फटका मच्छीमार बांधवांना बसतो आहे. त्यांना शासनाकडून नुकसानभरपाई देण्यात यावी.
वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्ताकरांमध्ये प्रचंड वाढ करण्यात आली आहे. वाढीव घरपट्टीमूळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे त्यामूळे तीमध्ये वाढ करण्यात येऊ नये, मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन, मुंबई बडोदरा महामार्ग, विरार अलिबाग कॉरिडोअर या प्रकल्पात बाधित शेतकºयांना योग्य मोबदला न मिळाल्यास विरोध केला जाणार आहे.

Web Title: the national highway jammed for half an hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.