‘त्या’ चार नगरसेवकांवर राष्ट्रवादी करणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 01:05 AM2019-09-19T01:05:01+5:302019-09-19T01:05:05+5:30

त्या चार नगरसेवकांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

Nationalist action against 'those' four councilors | ‘त्या’ चार नगरसेवकांवर राष्ट्रवादी करणार कारवाई

‘त्या’ चार नगरसेवकांवर राष्ट्रवादी करणार कारवाई

Next

डहाणू/बोर्डी : भाजपमध्ये प्रवेश करून पक्षविरोधी भूमिका घेतल्याप्रकरणी डहाणू नगरपरिषदेतील नगरसेवक मिहीर शहा, राजेंद्र माच्छी, शमी पिरा आणि भावेश देसाई यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लवकरच कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. तर या प्रवेशावेळी आमदार आनंद ठाकूर यांचे पुत्र करण हे उपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात विखे पॅटर्नची चर्चा रंगली आहे.
पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबई येथे राष्ट्रवादी पक्षातील डहाणू नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान स्वीकृत सदस्य मिहीर शहा आणि अन्य तीन नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषद सदस्य आनंद ठाकूर यांचे पुत्र करण हेही तेथे उपस्थित असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून त्यांची खेळी विखें पिता-पुत्रांप्रमाणे असल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सुजय आणि त्यानंतर राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भाजप प्रवेश केला होता.
दरम्यान, डहाणू नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर शहा भाजपमध्ये गेले होते. त्यावेळी निवडणुकीच्या काही दिवसआधी त्यांची मनधरणी करून घरवापसी करण्यात राष्ट्रवादीला यश आले होते. त्यानंतर ‘सुबह का भूला, शाम को घर लौटे तो उसे भूला नही कहते’, अशी प्रतिक्रिया त्यावेळी आमदार ठाकूर यांनी दिली होती. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या मुलानेच भाजपची वाट धरल्यानंतर वडिलही त्याच मार्गावर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तर नगरसेवक तन्मय बारी यांची डहाणू शहर अध्यक्षपदी वर्णी लावून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बंडखोरांविरुद्ध दंड थोपटले आहेत.
या नगरसेवकांच्या प्रवेशाबाबत पालकमंत्र्यांच्या फेसबूक पेज शिवाय अधिकृतपणे वाच्यता केली जात नसली तरी या प्रकरणाची गंभीर दखल राष्ट्रवादीने घेतली असून चारही नगरसेवकांवर कारवाई करण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला आहे.

Web Title: Nationalist action against 'those' four councilors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.