युतीमधील कटुता कायम, सुरेश टावरेंची मदार राष्ट्रवादीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 05:20 AM2019-03-31T05:20:50+5:302019-03-31T05:21:13+5:30

कपिल पाटील यांना कथोरेंचा टेकू, सुरेश टावरेंची मदार राष्ट्रवादीवर

Nationalist Congress Party, shiv sena and bjp alliance in trouble | युतीमधील कटुता कायम, सुरेश टावरेंची मदार राष्ट्रवादीवर

युतीमधील कटुता कायम, सुरेश टावरेंची मदार राष्ट्रवादीवर

Next

पंकज पाटील
विधानसभा । मुरबाड

मुरबाड : मुरबाड विधानसभा मतदारसंघातील आमदार किसन कथोरे यांच्या वर्चस्वाचा लाभ घेण्याचा प्रयत्न भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे युतीचे उमेदवार कपिल पाटील करत आहेत. या मतदारसंघात गेल्या पाच वर्षांत पाटील यांनी केवळ नाराजी गोळा करण्याचे काम केले आहे.

भरीसभर, बदलापूर शहरात शिवसेनाही भाजपाच्या विरोधातच काम करत होती. आघाडीचे उमेदवार सुरेश टावरे यांनाही राष्ट्रवादीच्या मदतीने, पाटील यांच्यावर नाराज असलेली मते वळवावी लागणार आहेत. ग्रामीण आणि शहरी भागांनी जोडलेल्या मुरबाड मतदारसंघात जातीय समीकरणांसोबत राजकीय गणितेही प्रभावी ठरली आहेत. या क्षेत्रात कपिल पाटील यांचा प्रभाव फारसा नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीत पाटील यांच्या विजयात मोदीलाटेसोबतच शिवसेनेचाही मोठा वाटा होता. त्यानंतरच्या विधानसभा आणि नगर परिषदा निवडणुकीत शिवसेना-भाजपा एकमेकांविरुद्ध लढले. त्यावेळी शिवसेनेला मागे सारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, प्रत्येकवेळी शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न झाला.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे आमदार किसन कथोरे यांनी भाजपात प्रवेश केला. त्यावेळी शिवसेनेला पराभव पत्करावा लागल्याने युतीमध्ये कटुता वाढली होती. बदलापूर पालिका निवडणुकीतही शिवसेना आणि भाजपात लढत झाली. शिवसेनेला शह देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: जाहीर सभा घेतली. तरीसुद्धा, या निवडणुकीत शिवसेनेने एकहाती सत्ता मिळवली. या निवडणुकीत कपिल पाटील यांनी साहजिकच भाजपाचे काम केल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी होती. अशा नानाविध कारणांमुळे बदलापुरात युतीमध्ये मोठी दरी निर्माण झाली. आता लोकसभेसाठी पक्षस्तरावर युती झाली असली, तरी स्थानिक पातळीवर कार्यकर्ते एकदिलाने काम करतीलच, याची ग्वाही सध्या तरी कुणीच देऊ शकत नाही. त्यांचे मनोमिलन करण्यासाठी नेते मंडळी प्रयत्न करीत असून, ते अद्याप तरी यशस्वी झाल्याचे दिसत नाही.

राजकीय घडामोडी
च्आ. कथोरे गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीत होते. त्यावेळी त्यांनी काँग्रेसचा प्रचार करताना कपिल पाटील यांच्याविरोधात भाषणे केली होती. आता पाटील यांचा प्रचार करताना त्यांची कोंडी होणार आहे.
च् मुरबाड नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपाने शिवसेनेला पराभूत केले होते. एवढेच नव्हे, तर सेनेचे तीनपैकी दोन नगरसेवक गळाला लावून सेनेला धक्का दिला होता.
च्त्यामुळे नगरपंचायतीवर भाजपाने एकहाती वर्चस्व मिळवले असले, तरी स्थानिक पातळीवर सेनेत मोठी नाराजी आहे.

दृष्टिक्षेपात राजकारण
जिल्हा परिषदेच्या आठपैकी चार जागा भाजपाकडे आहेत. उर्वरित तीन राष्ट्रवादीकडे आणि एक जागा शिवसेनेकडे आहे. पंचायत समितीच्या १६ जागांपैकी ११ जागांवर भाजपा, तर राष्ट्रवादी चार जागांवर विजयी झाली आहे. शिवसेनेकडे एकमेव जागा शिल्लक आहे.
बदलापूर नगर परिषदेत सेनेचे २४, तर भाजपाचे २० नगरसेवक आहेत. राष्ट्रवादीकडे दोन नगरसेवक असून, एक अपक्ष आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे कथोरे यांना ८५ हजार ५४३, राष्ट्रवादीचे गोटीराम पवार यांना ५९ हजार ३१३, तर शिवसेनेचे वामन म्हात्रे यांना ५३ हजार ४९६ मते मिळाली होती.
 

Web Title: Nationalist Congress Party, shiv sena and bjp alliance in trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.