नायगावमध्ये महिलेला मारहाण; वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 11:12 PM2019-06-07T23:12:44+5:302019-06-07T23:13:12+5:30
नायगाव पूर्वेकडील रश्मी स्टार सिटी इमारतीच्या जी/२ मधील रूम नंबर १०१ मध्ये प्रियदर्शनी किशोर भुसा (३२) या राहतात. त्या इमारतीचा वॉचमन सत्येंद्र दुबे हा प्रियदर्शनी यांना येता जाता टोमणे मारायचा.
नालासोपारा : नायगाव पूर्वेकडील एका इमारतीच्या चेअरमन, खजिनदार, सचिव, वॉचमन आणि त्याच्या मुलामुलीसह एकूण अकरा जणांनी मिळून ३२ वर्षीय महिलेला बांबू, व धारदार हत्याराने अमानुष मारहाण केल्याची घटना गुरु वारी संध्याकाळी घडली आहे. तिच्या पाठीवर आठ टाके पडले असून उपचारासाठी वसई विरार महापालिकेच्या सर डी पेटिट रु ग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी वालीव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नायगाव पूर्वेकडील रश्मी स्टार सिटी इमारतीच्या जी/२ मधील रूम नंबर १०१ मध्ये प्रियदर्शनी किशोर भुसा (३२) या राहतात. त्या इमारतीचा वॉचमन सत्येंद्र दुबे हा प्रियदर्शनी यांना येता जाता टोमणे मारायचा. ४ मेला मंगळवारी संध्याकाळी तिने च्याला चपलेने मारले. या सर्व घटनेचे इमारतीच्या सीसीटीव्ही मध्ये चित्रण झाले आहे. यानंतर वालीव पोलीस ठाण्यात सत्येंद्र याने प्रियदर्शनी यांच्याविरोधात तक्रार दिली. या गोष्टीचा राग मनात ठेवून वॉचमन सत्येंद्र पांडे याने मुलगा आाणि मुलीच्या साथीने व इमारतीच्या चेअरमन, सचिव, खजिनदार यांच्यासह ५ जणांनी मिळून प्रियदर्शनी यांना बेदम मारहाण करुन जखमी केले. त्यांना डोक्यावर बांबूने मारहाण केल्याने चेहऱ्यावर सूज आलेली आहे. प्रियदर्शनी यांच्या जबानीवरून वालीव पोलिसांनी गुरु वारी रात्री मारहाण करणाºया विरोधात वेगवेगळ्या कलमानव्ये गुन्हा दाखल केला आहे. सत्येंद्र पांडे याच्या मुलीने प्रियदर्शनी यांच्या हातावर तीन चावे सुद्धा घेतलेले आहे. तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
माझ्या पत्नीला इमारतीच्या पदाधिकाऱ्यांनी वॉचमन सत्येंद्र पांडे याच्या मुलाने व मुलीसह पाच जणांनी प्लानिंग करून अमानुष मारहाण केली आहे. इमारतीचे सर्व गेटला टाळे मारून व इमारतीचे सीसीटीव्ही सुद्धा बंद केले होते. पत्नीचे सोन्याचे मंगळसूत्रही मारहाणीत गहाळ झाले आहे. ज्यांनी मारहाण केली आहे त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे. - किशोर बाळकृष्ण भुसा, प्रियदर्शनीचे पती
मारहाणीचा गुन्हा दाखल केला असून वॉचमन सत्येंद्र पांडे, सेक्रेटरी विनोद यादव आणि खजिनदार ब्रिजभूषण सिंग यांना ताब्यात घेतले आहे. मारहाण झालेल्या महिलेला पाठीवर आठ टाके पडलेले असून रु ग्णालयात उपचार घेत आहे. एकूण ११ आरोपीनी महिलेस अमानुष मारहाण केली आहे. - उमेश पाटील, सहायक पोलिस निरीक्षक वालीव पोलीस ठाणे