राष्ट्रवादी-शिवसेनेचे तळ्यात-मळ्यात , भाजपाने कंबर कसली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 01:04 AM2017-10-05T01:04:29+5:302017-10-05T01:04:53+5:30
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी सर्वच पक्षांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. राष्ट्रवादी मात्र, अजून संभ्रमात असून शिवसेनेसोबत जायचे की नाही,
मुरबाड :जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी सर्वच पक्षांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. राष्ट्रवादी मात्र, अजून संभ्रमात असून शिवसेनेसोबत जायचे की नाही, याचा त्यांचा निर्णय अद्याप झालेला नाही. दुसरीकडे बाजार समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात गेली तरी बेहत्तर; परंतु, आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी भाजपने जोरदार कंबर कसली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने शिवसेनेसोबत हात मिळवणी करून सेवा सोसायट्यांच्या जोरावर निर्विवाद सत्ता स्थापन केली. त्यावेळीच राष्ट्रवादीचे माजी आमदार गोटीराम पवार यांचे पुत्र आणि टीडीसीचे संचालक सुभाष पवार हे शिवसेनेच्या नेते एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आले.
ते पक्षांतर करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले होते. पण तसे न घडल्याने राष्ट्रवादी सध्या तटस्थ आहे.