वसईतील अनधिकृत इमारतींना नळजोडण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 05:47 AM2018-12-21T05:47:31+5:302018-12-21T05:47:51+5:30

महापालिकेचा ठराव : ग्रामीण भागालाही केला जाणार पाणीपुरवठा

Necklaces for unauthorized buildings in Vasai | वसईतील अनधिकृत इमारतींना नळजोडण्या

वसईतील अनधिकृत इमारतींना नळजोडण्या

googlenewsNext

वसई : महानगरपालिकेच्या विरार येथे बुधवारी झालेल्या महासभेत शहरातील अनधिकृत इमारतीनाही नळजोडण्या देण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. त्याचबरोबर वसईतील ग्रामीण भागातील नऊ वर्षापूर्वी टाकलेल्या जलवाहिन्यांची दुरूस्ती करून किंवा नवीन जलवाहिन्या टाकून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे हजारो इमारतीमधील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर ग्रामीण भागात पालिकेचे पाणी येणार म्हणून आनंदाचे वातावरण आहे.

वाढती लोकसंख्या लोकांची घराची गरज ओळखून शहरात अनेक विकासकांनी हजारो अनधिकृत इमारती बांधल्या. अनेक बनावट बांधकाम परवानग्या वापरून, आरक्षित जागेवर अतिक्रमण करून बांधकामे झाली. खोटी कागदपत्रे दाखवून सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करून विकासक पळून जातात. महानगरपालिकेने शेकडो बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हे दाखल केले आहेत. परंतु त्यांनी यापूर्वीच फ्लॅट विकल्याने लोक या इमारतीत राहायला आले आहेत. त्यांच्यापुढे पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला होता.अनधिकृत इमारतींपैकी काहीना घरपट्टी लावण्यात आलेली आहे. मात्र नळजोडण्या नाहीत. या इमारतीच्या रहिवाशांची नावे मतदार यादीत आहेत. परंतु त्यांना पाणी नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली.

महानगरपालिकेच्या बुधवारी झालेल्या महासभेत अखेर नळजोडण्या देण्याचा विषय चर्चिण्यात आला होता. अनधिकृत इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना शास्ती न लावता प्रचलित दराने नळजोडण्या देण्यात याव्या, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच दंड न आकारता नळजोडणी देण्याची मागणी केली. जेष्ठ नगरसेवकांनी या प्रस्तावाचे समर्थन करतांना अनधिकृत इमारतीत राहणाºया नागरिकांना नळजोडणी मिळावी, असे सांगितले. याचबरोबर आता पश्चिम पट्टयÞातील गावांनाही येत्या काळात पाणी मिळणार आहे. शहरात वितरणाचे काम सुरू आहे. नऊ वर्षांपूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने टाकलेल्या जलवाहिन्या गंजल्या आहेत. त्या दुरूस्त करून अथवा नवीन जलवाहिन्या टाकून पाणी गावकºयांना द्यावे असे जेष्ठ नगरसेवक प्रफुल्ल साने व नगरसेवक मार्शल लोपीस यांनी महासभेत सांगीतल्यावर त्या जलवाहिन्या दुरुस्त होतील, असे शहर अभियंता जवादे यांनी स्पष्ट केले.

हा निर्णय कशामुळे घेण्यात आला?
सूर्याचे १०० दशलक्ष लीटर पाणी आले आहे. सध्या प्रतिक्षा यादीतील अधिकृत आणि भोगवटा प्रमाणपत्र मिळालेल्या इमारतींनाच नवीन नळजोडण्या देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शहरातील अनधिकृत इमारतीत राहणाºया नागरिकाना टँकरच्या पाण्यावरच अलवंबून राहावे लागत होते. आता सूर्याच्या पाण्याच्या वितरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे या अनधिकृत इमारतींमध्ये राहणाºया नागरिकांनाही पाणी द्यावे, अशी मागणी करण्यात येत होती.

Web Title: Necklaces for unauthorized buildings in Vasai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.