सर्वच कामगारांची चारित्र्य  पडताळणी करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 12:11 AM2020-11-30T00:11:40+5:302020-11-30T00:11:53+5:30

तारापूरला १७६८ जणांनी घेतले पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट 

The need to verify the character of all workers | सर्वच कामगारांची चारित्र्य  पडताळणी करण्याची गरज

सर्वच कामगारांची चारित्र्य  पडताळणी करण्याची गरज

Next

पंकज राऊत

बोईसर : पालघर जिल्ह्यातील  बोईसर पोलीस ठाणे क्षेत्रात  महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या  तारापूर एमआयडीसी-मध्ये औद्योगिक वसाहत तर तारापूर पोलीस ठाणे क्षेत्रात तारापूर अणु ऊर्जा केंद्र १ व २ आणि ३ व ४ बरोबरच   भाभा अणू संशोधन  केंद्र (बी. ए. आर. सी. ) हे 
सुरक्षितेच्या दृष्टीने  अत्यंत संवेदनशील असे प्रकल्प  असून या दोन्ही प्रकल्पांमध्ये नव्याने काम करणाऱ्या प्रत्येकाला चारित्र्य पडताळणीचा दाखला (पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट) पोलिसांकडून घ्यावे लागत असून या वर्षी  एकूण १७६८ जणांनी ते घेतले आहे. 
  काही वर्षांपूर्वी बीएआरसीतील बांधकामासाठी हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीला कंत्राटी कामगार पुरविणाऱ्या काँन्ट्रॅक्टरनी  त्यांच्या  कामगारांसाठी पी.सी.एस. मिळविण्यासाठी केलेल्या प्रतिज्ञापत्रात राहण्याचा पत्ता चक्क तारापूर बीएआरसी साईटचा दिला होता. वास्तविक पाहता  ज्या प्रकल्पात  कामाकरिता प्रवेश मिळायला हवा. त्याकरिता पी.सी.एस.ची  गरज आहे.  मग अगोदरच तेथे वास्तव्य कसे?  हे सर्व चक्रावून टाकण्यासारखे होते.या सर्व बाबी लक्षात घेता कामगारांची चारित्र्य पडताळणी होणे अत्यंत आवश्यक आहे.

मूळ गावातून माहिती मिळवणे आवश्यक
     
सुरक्षिततेच्या दृष्टीने  संवेदनशील  बीएआरसी आणि तारापूर अणुऊर्जा केन्द्रसारख्या  महत्त्वाच्या प्रकल्पात काम करण्यापूर्वी  विविध राज्यातील संबंधित कामगारांना त्यांच्या मूळ गावातील पोलीस स्थानकातून  गुन्हेगारी पार्श्वभूमीसंदर्भातील माहिती मागवून नंतरच प्रमाणपत्र दिले जाणे गरजेचे आहे. 

तारापूरमध्ये १७६८ कामगारांची पडताळणी तारापूर अणुऊर्जा प्रकल्प व भाभा 
अणु संशोधन केंद्र या दोन अतिशय संवेदनशील केंद्रात नव्याने काम करणाऱ्या प्रत्येकाला पोलीस  क्लिअरन्स सर्टिफिकेट घ्यावे लागते. त्यामुळे जानेवारी २०२० पासून आतापर्यंत एकूण १७६८ जणांनी सर्टिफिकेट घेतले असून १२७ जणांचे अर्ज पेंडिंग आहेत.
गृह विभागाच्या पोलीस क्लिअरन्स सर्विसेस या वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन फॉर्म भरावा लागतो.  अर्ज आल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत की नाही त्याची तपासणी करून  अहवाल पाठवला जातो. - संताेष जाधव,  सहाय्यक पोलीस निरीक्षक, तारापूर पोलीस ठाणे.

संवेदनशील अशा तारापूर अणुऊर्जा केंद्र तसेच  तारापूर औद्योगिक क्षेत्रात काम  करण्यापूर्वी त्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्ती तर नाहीत ना याकरिता खबरदारी म्हणून चारित्र्य पडताळणी होणे गरजेचे आहे.  - डी. के. राऊत, अध्यक्ष, तारापूर इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चर, असोसिएशन

पडताळणीसाठी असा करा अर्ज
महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या पोलीस क्लिअरन्स सर्विसेस या वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन फॉर्म भरावा लागतो. फॉर्म भरताना फोटो व सही अपलोड करून कशाकरता सर्टिफिकेट पाहिजे ते नमूद करावे लागते. 

Web Title: The need to verify the character of all workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस