दोन आरोग्य उपकेंद्रांच्या इमारती वापरा अभावी पडून
By admin | Published: February 23, 2017 05:26 AM2017-02-23T05:26:43+5:302017-02-23T05:26:43+5:30
तालुक्यात नवीन सहा उपकेंद्रे सुरू करण्याच्या प्रस्तावानुसार मुँह खु, व शेवता गावात बांधलेल्या
विक्रमगड : तालुक्यात नवीन सहा उपकेंद्रे सुरू करण्याच्या प्रस्तावानुसार मुँह खु, व शेवता गावात बांधलेल्या नवीन इमारती गेली सहा महिने उद्घाटनाअभावी पडून आहेत.
जांभा गावात उपकेंद्राची इमारत बांधण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने आरोग्य विभागाकडून ग्रामपंचायतीशी पत्रव्यवहार सुरू आहे. असे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. ग्रामीण भागात आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून विक्र मगड तालुक्यातील दादडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व जांभा, मुहू.बु, सावरोली, डोल्हारी.बु या ठिकाणी आरोग्य उपकेंद्रांना दोन वर्षा पूर्वी मंजुरी मिळाली आहे. परंतु, ही प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्र अजूनही सुरु झालेली नाहीत त्यामुळे ती कधी चालू होणार असा सवाल या गावातील नागरिक करत आहेत.
आदिवासी भागातील रुग्णांसाठी विक्र मगड तालुक्यात एकाच ग्रामीण रु ग्णालय असल्याने आरोग्य सेवेचा सर्व भार त्यावर येतो. रोजचे २५० ते ३०० बाह्य रु ग्ण येत असल्याने त्यांना तासन्तास प्रतिक्षा करावी लागते. जर ही उपकेंद्रे सुरू झाली तर रुग्णांची पायपीट आणि प्रतिक्षा वाचेल. तालुक्यात विक्र मगड येथे एक ग्रामीण रु ग्णालय, मलवाडा, तलवाडा, कुरंजे येथे प्राथमिक रु ग्णालय व २३ उपकेंदे्र आहेत.
तालुक्यांची लोकसंख्या जवळ जवळ दीड लाखाच्यावर गेल्याने या सहा केंद्रांचा आरोग्य विभागाकडून प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्या नुसार या त्यांना या पूर्वीच मंजूर मिळाली आहे. परंतु ती सुरू झालेली नाहीत. (वार्ताहर)
सर्वच केंद्रांमध्ये रिक्त पदांची समस्या
च्प्राथामिक आरोग्य केंद्र - तलवाडा - वैद्यकीय अधिकारी गट-अ, वैद्यकीय अधिकारी गट ब, औषध निर्माता, वाहनचालक, सफाई कामगार, आरोग्य सेविका अशी प्रत्येकी एक पदे रिक्त आहेत. तर शिपायांची ४ पदे रिक्त आहेत.
च्प्राथामिक आरोग्य केंद्र मलवाडा: वैद्यकीय अधिकारी गट, औषधनिर्माता, आरोग्य सहाय्यक स्त्री , वाहनचालक, सफाई कामगार असे प्रत्येकी १ पद रिक्त आहे. तर शिपायांची ४ पदे रिक्त आहेत
च्कुरंजे प्राथमिक आरोग्य केंद्र : वैद्यकीय अधिकारी गट- ब, सफाई कामगार यांचे एक पद रिक्त आहे. आरोग्य सेवक, शिपाई यांची दोन पदे रिक्त आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र कुरंजे, तलवाडा, मलवाडा व आरोग्य पथके तळवली, बोरांडा य ठिकाणी १० पदे रिक्त आहेत. आरोग्य विभागात कनिष्ठ सहाय्यकची ४ तर वाहन चालकाची २ पदे रिक्त आहेत.
आरोग्य केंद्र मंजूर
दादडे येथील नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजुरी मिळाली आहे. त्या दृष्टीने जागा उपलब्ध झाली असून ते लवकरात लवकर चालू करण्यात येणार असल्याची माहिती डॉ.रीतेश पटेल यांनी दिली.
मंजूर आरोग्य केंद्रे व उपकेंद्रे सुरु करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आलेला असून पदे भरल्यानंतर ती लवकरच चालू होतील
- डॉ. रीतेश पटेल,
आरोग्य अधिकारी प.स.विक्र मगड