वाडा नगराध्यक्षासाठी भाजपाच्या नीशा सवरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 02:47 AM2017-11-24T02:47:44+5:302017-11-24T02:47:55+5:30
वाडा : वाडा नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपाकडून निशा विष्णू सवरा यांचा उमेदवारी अर्ज आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांच्या उपस्थितीत गुरु वारी दाखल करण्यात आला.
वाडा : वाडा नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपाकडून निशा विष्णू सवरा यांचा उमेदवारी अर्ज आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांच्या उपस्थितीत गुरु वारी दाखल करण्यात आला.
यावेळी भाजपाचे प्रदेश समिती सदस्य बाबाजी काठोले, जेष्ठ नेते मधुकर पाटील, विभागीय सरचिटणीस योगेश पाटील, जिल्हा चिटणीस डॉ. हेमंत सवरा, तालुका अध्यक्ष संदीप पवार, पंचायत समिती सभापती अश्विनी शेळके व जि. प. महिला व कल्याण सभापती धनश्री चौधरी यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
भाजपकडून गुरुवारी नगराध्यक्षपदा सोबतच अन्य सात उमेदवारांनी उमेदवारी अर्ज वाडा तहसील कार्यालयात दाखल केले असून भाजपकडून सर्वच्या सर्व १७ उमेदवारांचे अर्ज दाखल करून आघाडी घेतली आहे.
प्रभाग क्र . १ रामचंद्र भोईर, २ अरुण खुलात, ३ वैभव भोपतराव, ४ कविता गोतराने, ५ अंजनी पाटील, ६ रीमा गंधे, ७ - समीर म्हात्रे, ८ अश्विनी डोंगरे, ९ माधुरी पाटील, १० मनीष देहेरकर, ११ कविता वाळुंजकर, १२ कविता पाटील, १३ रोहन पाटील, १४ जयेश थोरात, १५ प्रगती वलटे, १६ सुचिता पाटील , १७ वंदना गोरे आता इतर पक्षांच्या उमेदवारांची उत्सुकता लागली आहे.
>विकासासाठी कटिबद्ध - सवरा
वाड्याच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी दिले आहे..
गुरुवारी वाडा नगर पंचायत निवडणूकिसाठी निशा सवरा यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते पुढे म्हणाले की, वाड्याचा पाण्याची पाणी समस्या, डम्पिंग ग्राउंड, तलाव सुशोभीकरण, अंतर्गत रस्ते यासह अन्य प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येणार असून त्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही सवरा यांनी सांगितले.