नेपाळी घरफोड्यांच्या टोळीस अटक

By admin | Published: June 12, 2016 12:38 AM2016-06-12T00:38:09+5:302016-06-12T00:38:09+5:30

वसई-विरारसह गुजरातमध्ये घरफोड्या करणाऱ्या नेपाळी गँगच्या दोघांना माणिकपूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून यातील एक आरोपी फरार झाला आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी

Neighboring house gang rape | नेपाळी घरफोड्यांच्या टोळीस अटक

नेपाळी घरफोड्यांच्या टोळीस अटक

Next

वसई : वसई-विरारसह गुजरातमध्ये घरफोड्या करणाऱ्या नेपाळी गँगच्या दोघांना माणिकपूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून यातील एक आरोपी फरार झाला आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी लाखोंचा ऐवज जप्त केला आहे. दिवसा वॉचमनची नोकरी करणारे नेपाळीच रात्री घरफोड्या करीत असल्याचे उजेडात आले आहे.
माणिकपूर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी पेट्रोलिंंग करीत असताना तीन इसम संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आल्यानंतर चौकशी केली असता त्यातील एक जण पसार झाला. दोघांना ताब्यात घेतल्यानंतर ही टोळी घरफोडी करण्यासाठी जात असल्याचे तपासात उजेडात आले.
धर्मराज दाराम शर्मा (३५, रा. सह्याद्री सोसायटी) आणि प्रकाश पम गिरी (३५, रा. सैती अचल नेपाळ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील धर्मराज सह्याद्री सोसायटीत वॉचमनचे काम करीत आहे. तो रहात असलेल्या सोसायटीच्या वॉचमन हाऊसची झडती घेतली असता एका बॅगेत ११ लाख ५८ हजार ४०० किंमतीचे सोने-हिऱ्याचे दागिने, ८७ हजार ६४० हजार रोख रक्कम, ९० हजार किंमतीचे मोबाइल, लॅपटॉप, घड्याळे, विदेशी नाणी मिळून १३ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या टोळीने माणिकपूर हद्दीत तीन तसेच सुरत येथे एक अशा चार घरफोड्या केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Neighboring house gang rape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.