महापौरपदी नवा चेहरा की निष्ठावंत हेच औत्सुक्याचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 02:19 AM2019-11-14T02:19:25+5:302019-11-14T02:19:32+5:30

वसई विरार महापालिकेतील महापौरपद यापुढे आता अनुसूचित जमाती (सर्वसाधारण) या घटकासाठी आरक्षित झाले

The new face of the mayor is loyal to Otsuki | महापौरपदी नवा चेहरा की निष्ठावंत हेच औत्सुक्याचे

महापौरपदी नवा चेहरा की निष्ठावंत हेच औत्सुक्याचे

Next

आशिष राणे
वसई : वसई विरार महापालिकेतील महापौरपद यापुढे आता अनुसूचित जमाती (सर्वसाधारण) या घटकासाठी आरक्षित झाले असून, त्यामुळे आता पुढीलवर्षी नव्या चेहऱ्याला संधी की जुन्या-जाणत्यांची वर्णी लागणार ? याची उत्सुकता आहे. याआधी हे पद खुल्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित होते.
पालिकेत बहुजन विकास आघाडीची एकहाती सत्ता आहे. ११५ पैकी १०९ नगरसेवक बविआचे आहेत. आरक्षण कुठल्याही जातीधर्माचे असो सर्वजाती धर्मसमुदाय व त्यांच्या कार्यकर्त्यांना एकित्रत घेऊन बविआने आजवर महापौरपदी संधी दिली आहे.
बुधवारी अनुसूचित जमाती सर्वसाधारण पद म्हणून आरक्षण पडेल असले तरी कुठलाही परिणाम होणार नाही अशी माहिती बविआचे प्रवक्ते अजीव पाटील यांनी दिली. वसई विरार पालिकेची मुदत पुढीलवर्षी संपत असून ज्या राज्यातील विविध महापालिकांच्या या महापौरपदाची मुदत १५ सप्टेंबरला संपुष्टात आली होती. मात्र विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीमुळे या पदासाठी आरक्षण सोडतीला मुदतवाढ देण्यात आली होती. महापौरपद अनुसूचित जमाती सर्वसाधारण घटकाकडे गेले आहे. वसई विरारमध्ये कुठल्याही जाती धर्माचे आरक्षण पडले तरीही त्याचा बविआच्या राजकीय परिस्थितीवर कुठलाही परिणाम होणार नाही,हे सत्य आहे.
>यावेळी एका वार्डमधून दोन महिला व दोन पुरु ष असे चार उमेदवार पालिका निवडणूक लढवणार आहेत.त्यातच आजवर पालिकेकडे आलेले आरक्षण हे सर्व प्रकारचे आरक्षण चालत आलेले आहे. त्यामुळे यंदा अनुसूचित जमातीसाठी पडलेले आरक्षण याचे आम्ही स्वागत करतो. मात्र बविआची कुठल्याही परिस्थितीत राजकीय समीकरणे बदलणार नाही, हे अगदी निश्चित. -अजीव पाटील, बविआ, मुख्य प्रवक्ते

Web Title: The new face of the mayor is loyal to Otsuki

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.