सोमवारपासून महिनाभर नवीन वरसावे पूल बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 12:36 AM2018-11-24T00:36:00+5:302018-11-24T00:36:10+5:30

राष्ट्रीय महामार्ग क्र . ८ वरील भार्इंदर-वसई दरम्यान असलेला नवीन वरसावे पूल दुरुस्तीसाठी २६ नोव्हेंबर ते २५ डिसेंबर २०१८ या कालावधीत पूर्णत: बंद राहणार आहे.

 New month bridge from Monday to close | सोमवारपासून महिनाभर नवीन वरसावे पूल बंद

सोमवारपासून महिनाभर नवीन वरसावे पूल बंद

googlenewsNext

वसई : राष्ट्रीय महामार्ग क्र . ८ वरील भार्इंदर-वसई दरम्यान असलेला नवीन वरसावे पूल दुरुस्तीसाठी २६ नोव्हेंबर ते २५ डिसेंबर २०१८ या कालावधीत पूर्णत: बंद राहणार आहे. या कालावधीत वाहनांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी शुक्रवारी केले. मात्र, यामुळे मुंबई-अहमदाबादसह घोडबंदर मार्गावर वाहनचालकांना यामुळे महिनाभर वाहतूककोंडीला सामोरे जावे लागणार आहे.
या पुलाच्या दुरुस्तीचे काम दोन टप्प्यांत करण्यात येणार असल्याने पहिली मार्गिका १५ दिवस बंद करण्यात येत आहे. या मार्गिकेच्या बंद कालावधीत तिच्यालगत असणाऱ्या दुसºया मार्गिकेवरून हलक्या वाहनांना वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पहिल्या मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यानंतर सदर मार्गिकेलगत असलेल्या दुसºया मार्गिकेचे काम सुरू केले जाईल. या कालावधीत या मार्गिकेवर हलक्या वाहनांची वाहतूक बंद करण्यात येऊन दुरु स्त झालेल्या पहिल्या मार्गिकेवरून पुन्हा हलक्या वाहनांना वाहतूक करण्यास परवानगी देण्यात येईल, असेही जिल्हाधिकाºयांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. या कालावधीत नवीन वरसावे पुलावरून सुरतकडून मुंबई-ठाणे-दहीसर वाहतूक करण्याकरिता सर्व जड-अवजड वाहनांना मनाई करण्यात येईल आणि याच जड वाहनांची वाहतूक पुढील तीन पर्यायी मार्गांवर वळवण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी पालघर यांनी दिली आहे.

जुना वरसावे पूल राहणार हलक्या वाहनांसाठी खुला
मुंबई-अहमदाबाद या दोन शहरांना जोडणाºया महामार्गावरील वरसावे हा नवीन पूल महत्त्वाचा असून येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते.
त्यामुळे या पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी वाहतूकदारांकडून सतत होते. दरम्यान, या पुलाच्या दोन भागांना जोडणारे सांधे खराब झाले आहेत.
डागडुजीसाठी तो जड-अवजड वाहनांसाठी महिनाभर बंद ठेवला जाणार असून यादरम्यान जुना पूल हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला राहणार असल्याचे जिल्हाधिकाºयांनी स्पष्ट केले.

विशेष वाहनांना परवानगी
वाहतूक नियंत्रण अधिसूचना महसूल विभागाची वाहने, पोलीस वाहने, अग्निशमन दलाची वाहने, रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहने, तालुका दंडाधिकारी व भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, सुरत यांनी परवानगी दिलेल्या वाहनांना लागू राहणार नाही, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने अधिसूचनेत स्पष्ट केले आहे.

हे आहेत पर्यायी तीन मार्ग
अहमदाबादकडून ठाणे, मुंबईकडे येणारी जड-अवजड वाहने मनोर-वाडा-भिवंडी-ठाणे येथून इच्छुकस्थळी जातील.
विरार बाजूकडून ठाणे, मुंबईकडे येणारी जड-अवजड वाहने शिरसाटफाटा-गणेशपुरी-वज्रेश्वरी अंबाडी-भिवंडी-ठाणे येथून इच्छुकस्थळी जातील.
वसई-विरार महानगरपालिका हद्दीतून जाणारी जड-अवजड वाहने ही चिंचोटी-कामण-अंजूरफाटा-भिवंडी-ठाणे येथून इच्छुकस्थळी जातील.

Web Title:  New month bridge from Monday to close

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.