नव्या वर्सोवा पुलाचा करार

By admin | Published: July 4, 2017 06:33 AM2017-07-04T06:33:44+5:302017-07-04T06:33:44+5:30

घोडबंदरच्या वर्सोवा पुलाचा भाग खचल्यानंतर नवीन पुलाच्या उभारणी बाबत ३ एप्रिल रोजीच करारनामा झाल्याचे पत्र केंद्रीय मंत्री पोंनु राधाकृष्णन

New Versova Bridge Agreement | नव्या वर्सोवा पुलाचा करार

नव्या वर्सोवा पुलाचा करार

Next

हितेन नाईक/लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर : घोडबंदरच्या वर्सोवा पुलाचा भाग खचल्यानंतर नवीन पुलाच्या उभारणी बाबत ३ एप्रिल रोजीच करारनामा झाल्याचे पत्र केंद्रीय मंत्री पोंनु राधाकृष्णन यांनी खासदार चिंतामण वनगा यांना पाठविले आहे. त्यांनीच याबाबतचा प्रश्न लोकसभेत विचारला होता.
मुंबई-गुजरात या राज्यांना जोडणाऱ्या महामार्ग क्र. ८ वर घोडबंदर येथे या पुलाची उभारणी अनेक वर्षांपूर्वी करण्यात आली होती. दररोज लाखो अवजड वाहनांची वाहतूक या पुलावरून होत असल्याने व समुद्राचे खारे पाणी, ऊन, वारा, पाऊस याचा मारा तो झेलीत असल्याने त्याची झीज होऊन तो धोकादायक बनला होता. त्यामुळे त्याच्या दुरुस्तीसाठी या मार्गावरची वाहतूक बंद करण्यात येऊन ती अन्यत्र वळविण्यात आली होती. त्याचा मोठा फटका माल वाहतुकी बरोबरच रुग्ण व दररोज प्रवास करणाऱ्या लाखो चाकरमान्यांना बसला होता. त्यामुळे नव्या पुलाच्या उभारणीसाठी खासदार चिंतामण वणगा हे प्रयत्नशील होते. त्यासाठी त्यांनी त्याबाबतचा प्रश्न संसदेच्या हिवाळी अधिवेशनात उपस्थित केला होता.

असे केले खासदारांनी प्रयत्न
केंद्राकडे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, आयआरबीकडे दाद लागत नसल्याने शेवटी त्यांच्यावर आपल्या मतदार संघातील महत्वपूर्ण असलेला वर्सोवा पुलाचा प्रश्न १० डिसेंबर २०१४ रोजी लोकसभेत उपस्थित केला. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग राज्यमंत्री पोंनु राधाकृष्णन ह्यांनी खासदार वनगा यांना पाठविलेल्या पत्रात आपली वर्सोवा पुलाच्या नवीन उभारणीची मागणी मान्य करण्यात आली असून ३ एप्रिल २०१७ रोजी नवीन पूल उभारणी बाबत करारनामे करण्यात आल्याबाबतचे पत्र पाठविले आहे.

Web Title: New Versova Bridge Agreement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.