बालमृत्यू रोखणे हाच नव्या वर्षाचा संकल्प - आरोग्य मंत्री डॉ.दिपक सावंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 05:46 PM2017-12-31T17:46:23+5:302017-12-31T17:46:26+5:30
कुपोषण बालमृत्यूच्या समुळ उच्चाटनासाठी शासनाचा कोणताही नियम आड येणार नसून याठिकाणी वैद्यकिय अधिकार्यांची भरती करण्यात आली
रविंद्र साळवे
मोखाडा : याभागातील कुपोषण बालमृत्यूच्या समुळ उच्चाटनासाठी शासनाचा कोणताही नियम आड येणार नसून याठिकाणी वैद्यकिय अधिकार्यांची भरती करण्यात आली असुन अजूनही तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी भरले जाणार असून यांच्यासाठी पगाराची मर्यादा २ लाखापर्यंत वाढविण्यात आल्याची माहीती आरोग्य मंत्री सावंत यांनी दिली तर पावसाळ्यात वाढणाऱ्या कुपोषणावर मात करण्यासाठी आतापासुनच प्लॅन तयार करण्याचे आदेश उपस्थित अरोग्य अधिकाऱ्यांना त्यानी दिले यावेळी याभागातील कुपोषण आणि बालमृत्यूचे समूळ उच्चाटन हाच माझा नवीन वर्षाचा संकल्प असल्याचे सावंत यांनी यावेळे सागितले.
मोखाडा ग्रामीण रुग्णालयाला दिलेल्या अचानक भेटी दरम्यान सावंत यांनी येथिल आरोग्य कर्मचारी परीचारीका राहत असलेल्या निवासस्थानचीही पाहणी करीत अतिशय दुरावस्था असलेल्या या ईमारतीची तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश देवून आज याबाबत बैठकही बोलावली आहे तर येथिल रुग्ण ऑपरेशन थिएटर तसेच बाल उपचार केंद्रातील बालकांची पाहणी केली.यावेळी कुपोषित बालकांची उपचार केंद्रातून सुट्टी झाल्यानंतर त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्या बालकाच्या घरी आशा सिस्टर यांची भेट ठेवण्यासंबधीही सुचना केल्या.
यावेळी नगराध्यक्षा मंगला चौधरी जिल्हा प्रमुख उत्तम पिंपळे माजी नगराध्यक्ष दिनेश भट गटनेते प्रकाश निकम विक्रमगड विधानसभा प्रमुख प्रल्हाद कदम माजी तालुका प्रमुख रवींद्र कटीलकर तर जिल्हा शल्य चिकित्सक कांचन वानेरे जिल्हा आरोग्य अधिकारी सतोष गायकवाड तालुका आरोग्य अधिकारी श्रीकान कुलकर्णी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक महेश पाटील आदी उपस्थित होते