पुढच्या वर्षी डोल्हारा होणार टॅँकरमुक्त; ६ कोटी ६४ लाख भरीव निधी उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 12:22 AM2018-04-20T00:22:55+5:302018-04-20T00:22:55+5:30
पाणी टंचाईमुळे राज्यभरामध्ये चर्चेला आलेल्या डोल्हारे गाव पुढील वर्षी टॅँकरमुक्त होणार आहे. येथील प्रतिक्षित पाणी साठवण तलावाचे काम पुढील महिन्यामध्ये पुर्णत्वास जाणार असल्याने या भागातील पाण्याची समस्या सुटणार असल्याची माहिती लघु पाठबंधारे विभागाचे उपअभियंता एन. एस. मोहिते यांनी लोकमतला दिली आहे.
- रविंद्र साळवे
मोखाडा : पाणी टंचाईमुळे राज्यभरामध्ये चर्चेला आलेल्या डोल्हारे गाव पुढील वर्षी टॅँकरमुक्त होणार आहे. येथील प्रतिक्षित पाणी साठवण तलावाचे काम पुढील महिन्यामध्ये पुर्णत्वास जाणार असल्याने या भागातील पाण्याची समस्या सुटणार असल्याची माहिती लघु पाठबंधारे विभागाचे उपअभियंता एन. एस. मोहिते यांनी लोकमतला दिली आहे.
२०१२ या वर्षी भिषण पाणी टंचाईमुळे डोल्हारा येथील पार्वती जाधव या आदिवासी महिलेला प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर लघुपाटबंधारे विभागाने १ कोटी ५६ लाख रु पये अंदाज पत्रकीय रक्कमेच्या पाझर तलावाच्या कामाला मंजुरी दिली होती.त्वरीत स्थानिक आमदार व खासदारांच्या हस्ते उद्घाटन करून २०१२ मध्ये या कामाला सुरुवात झाली होती. परंतु कागदपत्रांच्या पुर्ततेत व वारंवार कामात झालेला फेरबदल यामुळे या साठवण तलावाचे काम गेल्या पाच ते सहा वर्षे रखडले होते.परंतु या कामाच्या सुधारित संकल्प चित्रानुुुसार डिजाईन काँक्र ीट हायग्रेट केला जाणार असल्याने यासाठी ६ कोटी ६४ लाख भरीव निधी उपलब्ध झाला आहे. या तलावाची व्याप्ती १३ हेक्टर च्या आसपास पाणी साठा होणार असूूून मे २०१८ अखेर पर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. यामुुुळे पुढच्या वर्षी डोल्हारा गाव टँकर मुक्त व पाणी टंचाई मुक्त होईल अशी अशा आहे.
गाव उंचावर असल्याने तीव्र टंचाई
डोल्हारा गावची लोकसंख्या १४६० एवढी असून हे गाव उंच टेकडीवर वसलेले आहे. तसेच विहीरीचे अंतरही खुप दुरवर आह.े उन्हाळ्यात विहीर तळ गाठत असल्याने टँकरच्या पाण्याने डोल्हारा वासियांना तहान भागवावी लागते. येथील पाण्याचा प्रश्नही अतिशय गंभीर आहे. यामुळे २०१२ मध्ये पार्वती जाधव या महिलेला घोटभर पाण्यासाठी आटापिटा करत असताना जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली होती.