एनएचएसआरसीएल करणार दीड लाख कांदळरोपांची लागवड !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 03:57 AM2019-07-01T03:57:29+5:302019-07-01T03:57:37+5:30

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन साकारणाऱ्या नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लि.तर्फे (एनएचएसआरसीएल) एक लाख ६० हजार कांदळरोपांची लागवड केली जाणार आहे अशी माहिती जनसंपर्क अधिकारी विनय उपासनी यांनी लोकमत ला दिली आहे.

 NHSRCL planting one and a half lakh kantrol plants! | एनएचएसआरसीएल करणार दीड लाख कांदळरोपांची लागवड !

एनएचएसआरसीएल करणार दीड लाख कांदळरोपांची लागवड !

Next

- आशिष राणे

वसई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन साकारणाऱ्या नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लि.तर्फे (एनएचएसआरसीएल) एक लाख ६० हजार कांदळरोपांची लागवड केली जाणार आहे अशी माहिती जनसंपर्क अधिकारी विनय उपासनी यांनी लोकमत ला दिली आहे.
दरम्यान त्यासाठी बुलेट ट्रेन मार्गावरील प्रस्तावित ठाणे स्थानक परिसराची पुनर्रचना करण्यात आली असून त्यायोगे कांदळवनांचे रक्षण करण्यात येणार आहे. नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लि.चे व्यवस्थापकीय संचालक अचल खरे यांनी यां सदर्भात सांगितले की, ‘मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या वन्यजीव आणि सीआरझेड परवानग्या प्राप्त करण्यात आल्या आहेत.
वनांबाबतच्या परवानगीला मात्र एक अट ठेवण्यात आली आहे. बुलेट ट्रेन मार्गावरील प्रस्तावित ठाणे स्थानक रचनेचा पुनर्आढावा घेऊन तेथे सद्य:स्थितीत असलेल्या कांदळवनांवर होणाºया परिणामांची तीव्रता कमी करावी, असे आवाहन केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून करण्यात आले होते. त्यानुसार आम्ही या सगळ्या गोष्टींचा सखोल अभ्यास केला. प्रस्तावित बुलेट ट्रेन मार्गावर असलेल्या ठाणे स्थानकाचे स्थान अबाधित ठेवून स्थानक परिसराची पुनर्रचना करण्यावर भर देण्यात आला आहे,यासंदर्भात जपानी अभियंत्यांशी चर्चा करून पुनर्आराखडा तयार करण्यात आला. यावेळी ते पुढे म्हणाले की, ठाणे स्थानक परिसरातील प्रस्तावित पार्किंग आणि प्रवासी आगमन-निर्गमन या दोन ठिकाणांची पुनर्रचना करण्यात आली.
त्यानुसार नष्ट होणा-या ३२ हजार ४४ कांदळवनांच्या बदल्यात आम्ही तब्बल एक लाख ६० हजार कांदळवनांची नव्या ठिकाणी लागवड करणार आहोत.
या सगळ्या प्रक्रि येचा खर्च एनएचएसआरसीएल करणार आहे. त्यासाठी आवश्यक रक्कम कांदळवन विभागाकडे सोपवली जाणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले. यामुळे पर्यावरणाचे विशेषत: मत्स्य प्रजोत्पदनाचे मोठ्या प्रमाणात संवर्धन होणार आहे.

- आधीच्या आराखड्यात ही दोन्ही ठिकाणे कांदळवन क्षेत्रात येत होती. मात्र, त्यांचे स्थान आता बदलण्यात आले आहे. प्रस्तावित ठाणे स्थानक परिसरामुळे १२ हेक्टर कांदळवन क्षेत्रावर परिणाम होत होता. आराखड्याच्या पुनर्रचनेमुळे बाधित होणारे क्षेत्र केवळ तीन हेक्टरच असणार आहे.
- संपूर्ण बुलेट ट्रेन प्रकल्पा दरम्यान ५३ हजार कांदळवनां ऐवजी आता केवळ ३२ हजार ४४ कांदळवनांवरच परिणाम होणार असून २१ हजार कांदळवने सुरक्षित राहणार आहेत.त्यांनी ही बाधित होणा-या ३२ हजार कांदळवनांची भरपायी आम्ही करणार आहोत. एकास पाच या प्रमाणे आम्ही कांदळवनांची लागवड ही करणार आहोत असे सांगितले.

Web Title:  NHSRCL planting one and a half lakh kantrol plants!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.